शिक्का फेरवापर हानीकारक

Dainik Gomantak
शुक्रवार, 15 मे 2020

सकारात्मक असलेल्या व्यक्तींवर वापरलेला शिक्का जो नंतर इतरांवर वापरला त्याना विषाणूच्या लागण होण्याची शक्यता असल्याने चौकशीसाठी बोलवायला पाहिजे.

पणजी

राज्यात प्रवेश करणाऱ्यांच्या हातावर अलगीकरण करण्यासाठी ज्या पद्धतीने शिक्के मारले जातात, त्या पद्धतीवर आम आदमी पक्षाने आक्षेप घेतला आहे. ती पद्धत आरोग्यास अपायकारक असून त्वरित थांबविणे आवश्यक आहे, असे या पक्षाचे म्हणणे आहे.
सीमेवरुन प्रवेश केलेल्या ज्या व्यक्ती करोना सकारात्मक असल्याचे आढळून आले आहे त्याना गोव्याच्या हद्दीत घेताना हातावर शिक्के मारले होते. त्यांच्या मागोमाग असलेल्यांच्या हातावर नंतर तोच शिक्का वापरला गेला. ही पध्दत नियमित चालत आली आहे. त्यामुळे सकारात्मक असलेल्या व्यक्तींवर वापरलेला शिक्का जो नंतर इतरांवर वापरला त्याना विषाणूच्या लागण होण्याची शक्यता असल्याने चौकशीसाठी बोलवायला पाहिजे. पक्षाने याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. टाळेबंदी कालावधीत राज्यात सुट्टीसाठी गोव्यात दाखल झालेल्या व्यक्तींची अमर्याद हालचाल थांबविली पाहिजे आणि अशा लोकांना परत पाठवावे अशी मागणी आपचे नेते सिध्दार्थ कारापुरकर यांनी केली आहे.
दरम्यान, शिक्षकांच्या सेवांचा वापर करुन गावोगांवी फिरुन केलेल्या आरोग्य सर्वेक्षणाचा निकाल जाणून घेण्याबाबत आम आदमी पक्षाने प्रयत्न केला आहे. सर्वेक्षणात श्वसन आजारांची सुमारे ५ हजार प्रकरणे आढळली आहेत हे सरकारने स्वत: मान्य केले होते. अशा व्यक्तींच्या आरोग्याची प्रगती समजून घेण्यासाठी  सरकारने लक्ष दिले का किंवा अशा तऱ्हेच्या लोकांना मदत केली का याची माहिती द्यावी अशी मागणी पक्षाचे संयोजक एल्विस गोम्स यांनी केली आहे.

 

संबंधित बातम्या