वीज दरवाढ मागे घ्या; अन्यथा वीज कार्यालयात घेराव : गोवा फॉरवर्डचा इशारा

लोकांना महागाईच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी गोवा फॉरवर्डला वीज कार्यालयावर मोर्चा आणून अधिकाऱ्यांना घेराव घालावा लागेल असा इशारा गोवा फॉरवर्डच्या उपाध्यक्ष ऍड. अष्मा सय्यद यांनी दिला आहे.
वीज दरवाढ मागे घ्या; अन्यथा वीज कार्यालयात घेराव : गोवा फॉरवर्डचा इशारा
Goa Electricity Price HikeDainik Gomantak

मडगाव : गोव्यात वीज खात्याने जी बिलात दरवाढ केली आहे आहे ती त्वरित मागे घ्यावी अन्यथा लोकांना महागाईच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी गोवा फॉरवर्डला वीज कार्यालयावर मोर्चा आणून अधिकाऱ्यांना घेराव घालावा लागेल असा इशारा गोवा फॉरवर्डच्या उपाध्यक्ष ऍड. अष्मा सय्यद यांनी दिला आहे. (Goa Electricity Price Hike)

Goa Electricity Price Hike
सांगे-पणसय मळ येथील ‘त्या’ चिरेखाणी बेकायदाच!

वीज खात्याने प्रति युनिट 5 ते 8 पैसे दरवाढ केली आहे. मागच्या 3 महिन्यातील ही दुसरी दरवाढ आहे. आधीच लोक कोविड महामारीमुळे पिचले आहेत. त्यांचा आर्थिक स्तर कमी झालेला आहे. अशात ही दरवाढ म्हणजे त्यांचे कंबरडे मोडून घालण्याचा प्रकार अशी टीका त्यांनी केली आहे.

सध्याच्या दरवाढीमुळे विजेचे बिल दरमहा तीन ते चार हजारांच्या घरात पोहोचलेले असून 15 ते 20 हजार पगार असलेल्या पगारदाराना हे बिल भरणे अशक्य होणार आहे. अशी दरवाढ करून सरकारने गरिबांच्या पैशांवर स्वतःचा फायदा करून घेऊ नये असा सल्ला देत या प्रकारात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी मागणी त्यानी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com