COVID19 Goa: गोव्यात मृत्यूचे तांडव सुरूच...

Review of Corona Outbreaks in Goa
Review of Corona Outbreaks in Goa

पणजी: राज्यात कोरोना (COVID19) नियंत्रणात यावा, कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी व्हावेत आणि नव्या कोरोना रुग्णांची (CVID19 Patients) संख्या मर्यादित राहावी यासाठी राज्य सरकार अथक प्रयत्न करत असून राज्यात लागू केलेल्या संचारबंदीमुळे लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येणे कमी झाले आहेत. आरोग्य खात्यानेही योग्य उपचार सुरू केल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण बरे होत आहेत. (Review of Corona Outbreaks in Goa)

गेल्या सहा दिवसांत तब्बल 19379 कोरोनाबाधित बरे झाले (Recovered Patients) आहेत. मात्र, कोरोनामुळे होणारे मृत्यू अद्यापही कमी झालेले नाहीत. आज दिवसभरात 53 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 2152  वर पोचली आहे. 

आरोग्य खात्याने आज दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज दिवसभरात 4265 कोरोना स्वॅब तपासण्या करण्यात आल्या. यापूर्वी केलेल्या चाचण्यांच्या आज आलेल्या अहवालानुसार 1562 नवे कोरोनाबाधित सापडले. आज दिवसभरात 4008 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 25 हजार 753 एवढी झाली आहे. 8 मे रोजी सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 32387 होती.                              

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com