Vasco : दामाेदर सप्ताहसंबंधी मुरगावात आढावा बैठक

वास्काेतील दामाेदर सप्ताह 3 ऑगस्टपासून साजरा होणार आहे. याच्या तयारी संबंधीचा पुन्हा आढावा घेण्यासाठी मुरगावच्या उपजिल्हाधिकारी स्नेहल प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
Review meeting in Murgaon regarding Damodar saptah
Review meeting in Murgaon regarding Damodar saptahDainik Gomantak

वास्को : वास्काेतील दामाेदर सप्ताह 3 ऑगस्टपासून साजरा होणार आहे. याच्या तयारी संबंधीचा पुन्हा आढावा घेण्यासाठी मुरगावच्या उपजिल्हाधिकारी स्नेहल प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत स्थानिक प्रशासन अधिकाऱ्यांनी विविध महत्त्वाच्या गोष्टींसंबंधी चर्चा केली. तयारी , कायदा व सुव्यवस्था संबंधी कोणती खबरदारी, वाहतुकीची व्यवस्था व इतर गोष्टीसंबंधी संबंधितांनी माहिती दिली.

सप्ताह काळात स्वातंत्र्य पथावर फेरी थाटण्यात येते. त्यामुळे स्वातंत्र्य पथ वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येत असल्याने एफ. एल गोम्स मार्गावर वाहतुकीचा अतिरिक्त ताण पडतो. वाहतूक व्यवस्थेसंबंधी योग्य नियोजन करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.

सप्ताह काळातील पहिले दोन तीन दिवस अवजड वाहनांची वाहतूक दाबोळी विमानतळ मार्गाने वरुणपुरी, बायणा उड्डाण पुल, सडा, मुरगाव बंदर अशी वळविण्यात येणार आहे. भाविकांच्या वाहनांमुळे पार्किंगचा प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी चारचाकी वाहने तानिया हॉटेलासमोरच्या मोकळ्या मैदानावर उभी करण्यात येणार आहेत, असे शैलेश नार्वेकर यांनी सांगितले.

Review meeting in Murgaon regarding Damodar saptah
काणकोण तालुक्यात 76 महिला उमेदवार निवडणुकीच्‍या रिंगणात

पोलिस निरीक्षक नायक यांनी कायदा व सुव्यवस्थासंबंधी माहिती दिली. कायदा व सुव्यवस्था व्यवस्थितपणे हाताळता यावा, यासाठी दक्षिण गोव्यातील विविध पोलिस स्थानकांतील पोलिस फौजफाटा वास्को सप्ताहाच्या काळात तैनात करण्यात येणार आहे. कोरोनामुळे दोन वर्षे वास्को सप्ताह सार्वजनिकरित्या साजरा झाला नव्हता. त्यामुळे यंदा सार्वजनिकरित्या साजरा होणाऱ्या सप्ताहाला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

मात्र, भाविकांनी सप्ताहामध्ये सहभागी होताना कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा योग्य अवलंब करण्याची गरज आहे. त्यासाठी भाविकांनी योग्य सहकार्य करावे, असे आवाहन नायक यांनी केले. दामोदर मंदिरा लगतच्या कोसंबी इमारतीच्या तळमजल्यावर तात्पुरते पोलिस आऊट पोस्ट उभारण्यात येणार आहे.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दहा टेहळणी मनोरे उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एक महिला व एक पुरुष असे दोन आरआयबी बटालियन तैनात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या सर्व गोष्टींवर दक्षिण गोव्यातील उपअधीक्षक नजर ठेऊन असतील असे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार साळकर यांनीही यंदाचा सप्ताह प्लास्टिकमुक्त करण्याचा आमचा निर्धार असल्याचे सांगितले. फेरीतील काही विक्रेते प्लॉस्टिक पिशव्यांचा उपयोग करतात. त्यांच्याविरोधात पालिका कारवाई करील.

त्यापासून संबंधित विक्रेत्यांनी बोध न घेतल्यास त्यांच्या दुकानाला सील मारण्यात येईल. पार्किंगमुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

हिंदुस्थान पेट्रोलियमने सुमारे नऊ हजार चौरस मीटर जागा मोकळी केल्याने त्या जागेवर वाहने उभी करण्याबाबत विचार चालू असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित अधिकारी त्या जागेची पाहणी करणार आहेत. येईल.वाहने वळविण्यात येणार आहे.

भाविकांच्या वाहनांमुळे पार्किंगचा प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी चारचाकी वाहने तानिया हॉटेलासमोरच्या मोकळ्या मैदानावर उभी करण्यात येणार आहेत, असे शैलेश नार्वेकर यांनी सांगितले.

दरम्यान, वास्को सप्ताहातील फेरी सात दिवसांची असेल असा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे सदर फेरी नऊ ऑगस्टला हटविण्यात येईल. मात्र दहा तारखेला पंचायत निवडणूक असल्याने पोलिस पंचायत निवडणूक बंदोबस्तांसाठी तैनात करण्यात येणार आहेत.

त्यामुळे सदर फेरी आठ तारखेलाच हटविण्यासंबंधी प्रयत्न सुरू आहे. फेरीच्या दिवसांसंबंधी पालिका निर्णय घेत असल्याने यासंबंधी पालिका अधिकाऱ्यांकडे चर्चा करण्यात येणार असल्याचे समजते.

या बैठकीला वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, नगरसेविका शमी साळकर, नगरसेवक दीपक नाईक, दामोदर भजनी उत्सव समितीचे अध्यक्ष कृष्णा सोनुर्लेकर, विनायक घोंगे, नगरसेवक दीपक नाईक, उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर, पोलिस निरीक्षक कपिल नायक, वाहतूक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर तसेच वीज, पाणी, रस्ते, अग्निशमन, पालिका इत्यादीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com