Goa Assembly Session :राज्यपालांकडून विकास कामांचा आढावा

गोवा आठव्या विधानसभेच्या तिसऱ्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.
Goa Assembly
Goa AssemblyDainik Gomantak

(Goa Assembly Session) विधानसभेत राज्यपालांच्या भाषणावेळी विरोधकांचा गदारोळगोवा आठव्या विधानसभेच्या तिसऱ्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. विधानसभेत राज्यपालांच्या भाषणावेळी विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळाला. यानंतर मार्शलनी आंदोलन करणाऱ्या विरोधकांना सभागृहाच्या बाहेर काढले. दरम्यान गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लईंनी विकास कामांचा आढावा घेतला.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लईं म्हणाले, ''पत्रादेवी ते मडगावपर्यंत 4 लेन NH काम प्रगतीपथावर आहे आणि 2023 च्या शेवटी ते काम पूर्ण होईल. तसेच मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते NH पर्यंत 6 लेन एक्स्प्रेस-वेचे काम प्रगतीपथावर आहे आणि ते ऑक्टोबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसेच आतापर्यंत 4 खाण ब्लॉक्सचा लिलाव झाला आहे आणि चारही यशस्वी बोली लावणाऱ्यांनी 43.19 कोटी रुपयांची 20% रक्कम अगोदर भरली आहे.

Goa Assembly
Goa Assembly Session : विधानसभेत राज्यपालांच्या भाषणावेळी विरोधकांचा गदारोळ

त्याच प्रमाणे त्यांनी फायर फायटरचेही कार्यही अधोरेखिले आहे. राज्यात वेगवेगळ्या आगीच्या घटनांमध्ये 80 जणांना वाचवण्यात यश आलंय आणि संबंधित घटनांमधून त्यांनी जवळपास 75. 60 cr. ची संपत्ती सुरक्षितरित्या वाचवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com