Goa Tourism : पर्यटन क्षेत्राची घडी पूर्ववत!

संबंधित उद्योगांना लाभ : पर्यटकांची संख्या वाढली
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

Goa Tourism : कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षात राज्यातील पर्यटन उद्योगावर परिणाम झाला होता. परंतु कोरोना नियंत्रणात आला असून यंदाचा पर्यटन हंगाम चांगला गेला आहे. देशी आणि विदेशी पर्यटक मोठ्या संख्येत गोव्यात आल्यामुळे पर्यटन उद्योग आणि निगडित घटकांना फायदा झाला आहे.

मात्र पुढचा पर्यटन हंगाम उत्तम जाणार याची खात्री पर्यटन खात्याने करण्याची आवश्‍यकता आहे, असे मत पर्यटन उद्योगाशी निगडित घटकांनी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केला आहे.

विदेशी पर्यटक ऑक्टोबर ते मार्च दरम्यान राज्यात येतात. यंदा युकेच्या नागरिकांच्या ई-व्हिसावरून समस्या निर्माण झाल्याने यूकेतून येणारे पर्यटक इतर स्थळांकडे वळले, कारण ते आपले नियोजन आठ महिन्यांपूर्वी करतात.

Goa Tourism
Women’s Day 2023 : गरिबीतही संसाराचा गाडा ओढणारी दीपाली परवार

मात्र दुसरीकडे रशियन पर्यटक पुन्हा येथे पोहोचले आहेत. त्याशिवाय कझाकिस्तान आणि इतर देशातून देखील पर्यटक येथे आले आहेत. त्यामुळे यंदाचा हंगाम देशी आणि विदेशी पर्यटक आल्याने उत्तम गेला आहे. तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंटना फायदा झाला आहे.

जर्मनी आणि फिनलंड सारख्या देशातील पर्यटन मार्केट ओळखून त्यांना आकर्षित करण्याची गरज आहे, असे गोवा प्रवास आणि पर्यटन संघटनेचे (टीटीएजी) अध्यक्ष नीलेश शहा यांनी सांगितले.

देशी पर्यटकांचा ओढा गोव्याकडे

मोपा विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्यानंतर विदेशी पर्यटकांना वर्षातून कधीही थेट गोव्यात येता येईल. मोपा विमानतळाचा आणखी एक फायदा झाला आहे, की छोट्या शहरातून उदाहरणार्थ लखनौ, रायपूर, नाशिक, कोची, अमृतसर येथून थेट विमानसेवा असल्याने देशी पर्यटकांच्या संख्येत देखील वाढ होणार आहे, असेही नीलेश शहा म्हणाले.

Goa Tourism
दुर्मिळ घटना! दारू पिऊन घेतल्या व्हायग्राच्या गोळ्या, नागपुरातील 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

निसर्गाचे संवर्धन आवश्‍यक

गोव्याचे वैशिष्ट म्हणजे येथील निसर्ग आहे आणि त्याचे जतन करण्याची आवश्‍यकता आहे. तसेच रस्त्याच्या बाजूला आणि इतर ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत असल्याने विदेशी पर्यटकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

कारण त्यांना घाण केलेली आवडत नाही. अनेक ठिकाणी पोलिस 10 वा. येऊन संगीत बंद करतात, तर इतर ठिकाणी पहाटे 6 वा. पर्यंत संगीत सुरू असते. यावर तोडगा काढण्याची आवश्‍यकता आहे, असे टीटीएजीचे माजी अध्यक्ष सावियो म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com