गोव्याची शिक्षण क्षेत्रात क्रांती

Revolution in the field of education in Goa
Revolution in the field of education in Goa

तेरेखोल: भारताच्या स्वातंत्र्यानंतर १४ वर्षांनी उशिरा गोव्याला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यामुळे स्वतंत्र देशाच्या तीन पंचवार्षिक योजनेला आम्ही मुकलो, तरीही १४ वर्षे मागे राहूनही आज गोवा देशाच्या नकाशावर अनेक क्षेत्रांत दिमाखाने विराजमान आहे. गोव्याने शैक्षणिक क्षेत्रांत मोठी क्रांती घडवून आणलेली आहे. शिक्षण हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यातून व्यक्तिमत्वाचा विकास होण्याबरोबरच विद्यार्थी सुशिक्षित व सुसंस्कारित होतो व त्यातूनच समाज संपन्न व्हावा हे उद्दिष्ट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समोर ठेवला असून त्या दृष्टीने प्रत्येकाचे योगदान महत्त्‍वाचे असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले.

हरमल पंचक्रोशी संकुलात मुक्तिदिनाच्या षष्टब्दीपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमात चेअरमन श्री. पार्सेकर बोलत होते यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यानंतर तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. 

यावेळी त्यांच्यासमवेत संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत नाईक, खजिनदार गंगाराम गडेकर, मुख्याध्यापिका सौ. स्मिता पार्सेकर, गणपत पार्सेकर महाविद्यालयाचे प्राचार्य उद्देश नाटेकर, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गोविंदराज देसाई यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते. 

दरम्यान, गोवा मुक्तिदिनाचे षष्टब्दीपूर्ती वर्ष विविध कार्यक्रमाने साजरे करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. प्रारंभी शिक्षक वर्गातर्फे देशभक्ती गीत सादर करण्यात आले. त्यांना संवादनीवर संगीत शिक्षक राजेश पुरखे व तबल्यावर राजू गांवकर यांनी संगीत साथ दिली. प्रोफेसर आरती गावस यांनी आभार मानले.

आणखी वाचा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com