Mahadayi Water Dispute : गोवा सरकारने म्हादई कर्नाटकला विकली; आरजीचे टीकास्त्र

पिसुर्लेतील सभेमध्ये गावोगावी जनजागृती करण्याचा निर्णय
RG Manoj Parab|Goa Politics
RG Manoj Parab|Goa Politics Dainik Gomantak

होंडा : रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षातर्फे पिसुर्ले येथे म्हादईप्रश्‍नी सभा आयोजित केली होती. या सभेमध्ये उपस्थित वक्त्यांनी गोवा सरकारने म्हादई कर्नाटकला विकली असल्याची टीका केली. तसेच पक्षातर्फे ‘टूगेदर फॉर म्हादई’च्या बॅनरखाली रविवार, 15 जानेवारीपासून राज्यभर व्यापक चळवळ सुरू केली असल्याचे सांगण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून पिसुर्लेत सभा घेण्यात आली. या विषयावर जनजागृती करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणतज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. (Mahadayi Water Dispute)

RG Manoj Parab|Goa Politics
Alcohol Smuggling: अनमोड घाटात मोठा दारुसाठा पकडला; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

काँग्रेसतर्फे कलश यात्रा

म्हादईप्रश्‍नी काँग्रेस पक्षाने वाळपई मतदारसंघातील नानोडा येथे म्हादई नदीचे पूजन करून कलश यात्रेला शुभारंभ केला. ही म्हादई कलश यात्रा संपूर्ण राज्यभर फिरणार आहे. यावेळी नानोडा येथे काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, वाळपई काँग्रेस गटाध्यक्ष कृष्णा नेने, पदाधिकारी वरद म्हार्दोळकर, अमरनाथ पणजीकर, माजी आमदार प्रताप गावस उपस्थिती होते.

म्हादई नदी पात्रात रेखाटली चित्रे : गुळेली येथे म्हादई नदीच्या पात्रात रविवारी विविध चित्रकार एकवटले आणि त्यांनी म्हादईच्या बचावासाठी चक्क नदी पात्रात चित्रे रेखाटली. यात आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. वॉटर कलर चित्रकार संघटनेने आयोजित केलेल्या या उपक्रमात प्रसिद्ध चित्रकारांनीही भाग घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com