Revolutionary Goans Ultimatum : वीरेश बोरकरांचा उपोषणाचा इशारा; आरजीची नेमकी मागणी काय?

स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना सरकारी नोकरीत सामावून न घेतल्याने आरजी आक्रमक
 Revolutionary Goans Ultimatum | Viresh Borkar
Revolutionary Goans Ultimatum | Viresh Borkar Dainik Gomantak

Revolutionary Goans Ultimatum : गोव्यात स्वातंत्र्यसैनिकांची सरकारने फसवणूक केली आहे. गोव्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना नोकरीचं खोटं आश्वासन देऊन सरकारने त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी केला आहे. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास उपोषणाला बसणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे.

गोव्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना सरकारने दिलेलं नोकऱ्यांचं आश्वासन अजूनही पूर्ण न केल्याने आज सोमवारी वीरेश बोरकरांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत काही स्वातंत्र्यसैनिकांचे वारसंही उपस्थित होते. सरकारने दिलेलं आश्वासन हवेतच विरलं असून त्यामुळे अनेकांचा नोकऱ्यांपासून वंचित राहावं लागल्याचा आरोपही रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या वीरेश बोरकरांनी केला आहे.

 Revolutionary Goans Ultimatum | Viresh Borkar
Mother Son Meet in Madgaon : चिमुकल्याची आईपासून ताटातूट; सुरक्षारक्षकाने 'अशी' घडवली मायलेकाची भेट

सरकारने आतापर्यंत पोकळ आश्वासनं देत फसवणूक केली, मात्र आता गप्प राहणार नाही असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. स्वातंत्र्यसैनिकांच्या 55 वर्षांहून अधिक वय असलेल्या वारसांना सरकारने एकरकमी सेटलमेंट द्यावी, तसंच अन्य मागण्यांची पूर्तताही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सरकारने मागण्या पूर्ण न केल्यास 19 डिसेंबरपासून उपोषणावर बसण्याचा इशाराही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com