
म्हादई नदीवरून (Mahadayi Water Dispute) गोव्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. सर्व विरोधीपक्ष या मुद्यावरून एकटले असून, राज्यातील भाजप सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने मात्र वेगळी भूमिका घेतली असून, म्हादईसाठी त्यांची लढाई विरोधीपक्ष करत असलेल्या लढाईपेक्षा वेगळी असल्याचे सांगितले.
परब यांनी शनिवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील म्हादईबाबत आपली भूमिका मांडली. यावेळी परबांना (Manoj Parab) पत्रकारांनी चांगलेच कोंडीत पकडले. दरम्यान, म्हादईचा मुद्दा आरजीमध्ये फूट पडण्याचे कारण बनला आहे.
रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षात म्हादई प्रश्नावरून फूट पडली आहे. पक्षाच्या एका गटाने अध्यक्ष मनोज परब यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत राजीनामा दिला. मनोज परब यांनी शनिवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हादई प्रश्नावर उद्या पिसुर्ले येथे जाहीर सभा घेणार असल्याचे सांगितले.
गोव्यातील राजकीय पक्षांपेक्षा आमची विचारधारा वेगळी असल्याने आम्ही वेगळा मार्ग अनुसरत आहोत, असे त्यांनी जाहीर केले. त्यांच्यावर इतर राजकीय पक्षांनी कठोर टीका करत ‘आरजी’ हा भाजपच्या षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप केला.
पत्रकार परिषदेत मनोज परब काय म्हणाले?
गोवा सरकारमधील मंत्र्यांचं शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला गेले होते. मात्र केवळ 15 मिनिटात ही भेट आटोपती घेत केंद्राकडून गोव्यातील भाजप नेत्यांची बोळवण केल्याचा टोला मनोज परब यांनी लगावला आहे.
गोव्यातील भाजपचं डबल इंजिन सरकार हे केंद्राला आपली बाजू समजावून देण्यात अपयशी ठरलं असून दिल्लीदरबारी झालेल्या भेटीत केवळ 15-20 मिनिटांमध्ये बैठक आवरत केंद्राने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना डावललं असल्याचा निशाणा परबांनी साधला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.