Old Goa: रायबंदर ते ओल्ड गोवा रस्ता एका आठवड्यासाठी होणार ‘वन-वे’..

संबंधित आदेश उत्तर गोव्याचे (Goa) जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी जारी केला आहे.
Old Goa: रायबंदर ते ओल्ड गोवा रस्ता एका आठवड्यासाठी होणार ‘वन-वे’..
Ribandar to Old Goa Road Dainik Gomantak

पणजी: रायबंदर ते ओल्ड गोवा मार्गादरम्यानचा रास्ता पुढील काही दिवस केवळ एकेरी वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. सेंट पेड्रो कडून ओल्ड गोवाकडे जाणारी वाहतूक शनिवार, 15 ते 21 जानेवारी दरम्यान “वन वे” असेल. ऑप्टिक फायबर केबल्सचे काम सुरू असल्याने रस्ता खोदकाम सुरू आहे. याबाबतचा आदेश उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी जारी केला आहे असून, इमॅजिन पणजी (Panjim) स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड (IPSMDL) ने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून सुमारे 1.5 किमी लांबीचे काम करण्यासाठी या रस्त्यावरील वाहतूक वळविण्याची परवानगी मागितली आहे. (Ribandar to Old Goa road to be one-way for week)

Ribandar to Old Goa Road
कोरोनासंसर्ग वाढताच, वाढत्या थंडीचा परिणाम?

संबंधित आदेश उत्तर गोव्याचे (Goa) जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी जारी केला आहे.

पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड (IPSMDL) ने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून सुमारे 1.5 किमी लांबीचे काम करण्यासाठी या रस्त्यावरील वाहतूक वळविण्याची परवानगी मागितली आहे. आदेशात, जिल्हाधिकार्‍यांनी कंत्राटदाराला वाहतुकीचे नियमन करण्यासाठी त्यांचे स्वतःचे ट्रॅफिक मार्शल तैनात करण्यास सांगितले आहे तसेच या रस्त्यावर आणि पदपथावर पार्किंग न करण्याचे आदेश दिले आहेत; रात्रीच्या वेळी होणारे अपघात टाळण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी लाल दिवे/लाइट लावणे आणि इतर सूचनांचे पालन करण्याबरोबरच सर्व ठिकाणी प्रमुख ठिकाणी “मेन अ‍ॅट वर्क” असा साईन बोर्ड लावणे बंधनकारक असणार आहे.

रस्त्याचा वापर करणाऱ्यांना आणि वाहनधारकांना अडथळा निर्माण करणारे बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकू नये, तसेच काम करताना कोणत्याही घर किंवा वसाहतीकडे जाण्यासाठी अप्रोच रस्ता अडवणार नाही याची काळजी घेण्यास तसेच तात्पुरता मार्ग बांधण्यासाठी कंत्राटदाराला सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com