Goa Ration Scam: तांदूळ, गहू तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार

मुख्यमंत्री घोटाळेबाजांवर कारवाई करणार का ?
Ration Scam
Ration ScamDainik Gomantak

सध्या गोवा राज्यात शासकीय गोदामातील तांदूळ व गहू चोरी प्रकरणाने उचल खाली असून राज्यभरात यावर जोरदार चर्चा सुरु आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

(Rice and wheat theft case mastermind Sachin Borkar is absconding)

Ration Scam
Vijai Sardesai on Ration Scam : गोव्यात लुटारुंसाठी 'All is Well'; धान्य घोटाळ्यावरुन सरदेसाईंची बोचरी टीका

मिळालेल्या माहितीनुसार काही तासांपूर्वी गोव्यातील अन्न पुरवठा खात्याच्या वेगवेगळ्या गोदामांतून चोरलेल्या तसेच फोंडा येथील एका गोदामातील सुमारे 1 टन किलो तांदूळ व गहू तस्करी करत ते कर्नाटकमध्ये पळवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काही साठा कर्नाटकमध्ये जात असतानाच कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. असे असले तरी या कारवाईतील मुख्य आरोपी सचिन नाईक बोरकर हा अद्याप फरार आहे.

Ration Scam
Goa coastal: राज्याच्या किनारी सुरक्षेला येणार बळकटी; नौदल, तटरक्षक दलाचा संयुक्त सराव सुरु

फरार बोरकर याच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र तो फरार असल्याने या मुद्यावरुन ही आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कारवाईत गहू, तांदळाची 1014 पोती, दोन ट्रक, दोन जीप व एक पीकअप जप्त करण्यात आली आहे.

राज्यात अन्नपुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत राज्यात अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यात मोठ्या प्रमाणात धान्यसाठाही जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणावरुन गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत, आतातरी मुख्यमंत्री घोटाळेबाजांवर कारवाई करणार का? असा संतप्त सवाल केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com