काणकोणात 300 हेक्टरमध्ये भात शेती

यंदा 20 हेक्टर क्षेत्रात वाढ ; युवा पिढीही कार्यरत
Rice cultivation in goa
Rice cultivation in goaDainik Gomantak

काणकोण : काणकोणात खरीप हंगामात 300 हेक्टर जमीन भात लागवडीखाली आहे. त्यात यंदा 20 हेक्टर पडीक जमीन नव्याने लागवडीखाली आणण्यात आली आहे. त्याशिवाय १५० हेक्टर जमीन खरीप हंगामात भाजी लागवडीखाली आहे, असे विभागीय कृषी अधिकारी किर्तीराज नाईक गावकर यांनी सांगितले.

काणकोण तालुका कृषिप्रधान तालुका आहे. मात्र काही वर्षांपूर्वी शेती व्यवसायात मरगळ आली होती. मात्र सरकारच्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना व सोयी सवलती उपलब्ध केल्यामुळे युवा पिढी या कृषी क्षेत्राकडे कार्यरत झाली आहे.

Rice cultivation in goa
Comedian Selvy Passes Away: मॅथ्यूस कोरेया उर्फ ​​कॉमेडियन सॅल्व्ही यांचे निधन

तालुक्यातील 3438 शेतकऱ्यांकडे कृषी कार्ड असून 1650 शेतकरी प्रधानमंत्री कृषी योजनेखाली आहेत. काणकोणमधील बहुतेक शेतकरी ज्योती, कर्जत, जया या भात बियाणांना पसंती देतात. त्याशिवाय गोवा धन -3, रत्नागिरी-6 या भात बियाणांची पेरणी शेतकऱ्यांकडून केली जाते.

खरीप तसेच वायंगण भात लागवडीसाठी तरवा तयार करून त्याची लागवड केली जाते. काही ठिकाणी हे काम ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालत असते. बहुतेक खरीप भात शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.

उकड्या तांदळांना मागणी :

काणकोणमधील उकड्या तांदळाला राज्यभरातून मागणी आहे. कर्जत, ज्योतीचे उकडे तादूळ 36 रूपये किलो दराने विकले जातात. काणकोणात बहुतेक शेतकरी यांत्रिक पद्धतीने शेती करत असल्याने शेती व्यवसाय सध्या काही प्रमाणात किफायतशीर बनला आहे.

भाताची लावणी ते कापणी, मळणी यासाठी यंत्राचा वापर केला जातो. कृषी खात्याच्या अनुदानाचा फायदा घेत सुमारे दोनशे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर व अन्य कृषी अवजारे घेतली आहेत.

जैवखाताला अनुदान हवे

अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतावर अनुदान दिले जात, मात्र कृषी जैव खताला प्राधान्य दिले जाता नाहीत. काणकोणमधील काही शेतकरी शेतात लागवडीसाठी पाला पाचोळा, शेणखत यांचा वापर करून भात पीक घेत आहेत, असे गावडोंगरी येथील एक युवा शेतकरी जानू गावकर व खोतीगावातील कृष्णा गावकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com