रिक्षा-दुचाकीधडकेत मळगावमध्ये एक गंभीर

प्रतिनिधी
रविवार, 16 ऑगस्ट 2020

मळगाववरून रेल्वेस्थानकाच्या पुलाजवळ रिक्षा-दुचाकी धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १४) दुपारी बाराच्या सुमारास घडली. यात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सावंतवाडी :  मळगाववरून रेल्वेस्थानकाच्या पुलाजवळ रिक्षा-दुचाकी धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १४) दुपारी बाराच्या सुमारास घडली. यात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाला गोवा बांबुली येथे हलविण्यात आले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तुळस येथील एक रिक्षा चालक रेल्वे स्टेशनच्या दिशेने येत होता तर दुचाकी चालक हे सावंतवाडीच्या दिशेने जात होते. 

यावेळी रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या पुलाजवळील वेंगुर्ले स्टॉपवर आले असता अचानक चुकीच्या पद्धतीने रिक्षा वळविण्याच्या नादात रिक्षा चालक विरुद्ध दिशेला जात तेथेच सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या एका दुचाकी चालकाला जोरदार ठोकर दिली. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गुरुनाथ भागवत आणि पोलीस कर्मचारी धनंजय नाईक यांनी पंचनामा केला. गंभीर जखमी दुचाकी चालकाला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना गोमेकॉत दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला.

संबंधित बातम्या