गोव्यात हेल्मेट जनजागृती तरी 77,819 जणांना दंड

नियमांचे सर्रास उल्लंघन : पाच महिन्यांत दररोज सरासरी 500 दुचाकीस्वारांवर कारवाई
गोव्यात हेल्मेट जनजागृती तरी 77,819 जणांना दंड
Helmet Fine Cases in GoaDainik Gomantak

पणजी : दरवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरीय पातळीवर रस्ता सुरक्षा सप्ताह पाळण्यात येतो. दुचाकीस्वारांचे मृत्यू प्रमाण अधिक असल्याने हेल्मट वापरण्याची जनजागृती केली जाते. तरीही दिवसेंदिवस विना हेल्मट प्रकरणांमध्ये वाढत आहेत. (Helmet Fine Cases in Goa)

Helmet Fine Cases in Goa
कॉंग्रेस बेकायदेशीर बांधकामाच्या मुद्द्यावरून सरकारला जाब विचारणार : पाटकर

यावर्षी गेल्या 5 महिन्यांत हेल्मेट न वापरल्याप्रकरणी 77,819 चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रतिदिन 500 हून अधिक विना हेल्मेटची प्रकरणे नोंद होत आहे.

वाहतूक पोलिस विभागाने राज्यात मोटार वाहन कायद्याखाली असलेल्या सुमारे 54 विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. त्यात अधिक तर प्रकरणे ही विना हेल्मेट (77,819), वाहनांच्या काळ्या काचा (31,394), गाडी चालविताना चालक वा सहचालकाने सीट बेल्ट न घालणे (34,573), नो एन्ट्री (21,308), नियमानुसार क्रमांक पट्टी न असणे (10,759), धोकादायक पार्किंग करणे (25,439) यांचा समावेश आहे. पोलिसांनी या विविध कलमांखाली 2,79,566 प्रकरणे नोंद केली आहेत व सुमारे 6.64 कोटी रुपयांचा महसूल दंडात्मक कारवाईतून जमा केला आहे. भरधाव वेगाने वाहने चालविल्याप्रकरणी पोलिसांनी 268 प्रकरणे नोंद केली आहे. वाहतूक पोलिस विभागाकडे स्पीड रडारची संख्या कमी आहे. त्यामुळे वेगाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात पोलिसांना अडथळे येत आहेत. सध्या चारच स्पीड रडार आहेत. अधिक तर हे स्पीड रडार नव्या मांडवी पुलाच्या पणजीच्या दिशेने उभे केलेले असतात.

वाहनांच्या काचा काळ्या करण्यास बंदी आहे. मात्र, तरीही मोठ्या प्रमाणात काळा काचा असलेल्या वाहनांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. राज्यात काही अलिशान वाहनांच्या काचा काळ्या आहेत. पण त्या अनेकदा रात्रीच्यावेळीच बाहेर काढण्यात येतात. त्यामुळे पोलिसांना कारवाई करताना अडचणी येतात. वाहनांच्या काचा या पारदर्शक असणे सक्तीचे आहे. या काळ्या काचाचा फायदा गुन्हेगार घेऊ शकतात. त्यामुळे या काळ्या काचांना बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी वाहनांच्या काळ्या काचाप्रकरणी 31,394 जणांवर कारवाई केली आहे. म्हणजेच दरदिवशी काळा काचा असलेली 210 वाहनांवर कारवाई होते. अशी वाहने दुप्पटीने असतील मात्र ती दिवसा बाहेर काढली जात नाही.

Helmet Fine Cases in Goa
कुठ्ठाळी संत्रात येथे रस्त्यावर माती आल्याने अपघाताची भीती

महामार्गावर देखरेखीची गरज

राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल, दोनपेक्षा अधिक पदरी असलेले रस्त्यांवरून भरधान वाहने जातात. वेगमर्यादाचे पालन न केल्यानेच महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या राष्ट्रीय महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच स्पीड रडार अधूनमधून तैनात करण्याची गरज आहे असे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

चालकांची मद्यतपासणी आवश्‍यक : पोलिसांनी गेल्या 5 महिन्यांत 389 मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई केली आहे. रात्रीच्यावेळी अनेक दुचाकीस्वार तसेच काही कारचालक मद्यालयातून बाहेर पडतात. मात्र, त्यांची तपासणी करण्यास पोलिसच रात्रीच्या वेळी दिसत नाही. वाहतूक पोलिसांकडून नियमीत तपासणीची आवश्‍यकता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com