गोव्याच्या 13 वर्षीय मुलीवर जोखमीची 'स्पायनल स्कोलिओसिस' शस्त्रक्रिया यशस्वी

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

मणिपाल हॉस्पिटलमध्ये 13 वर्षीय मुलीवर स्पायनल स्कोलिओसिसची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. 

दोनापावल: या शस्त्रक्रिये मध्ये मुलीचे कुबड घालवण्यासाठी पाठीच्या कण्यामध्ये रॉड्स बसवण्यात आले आणि त्याच बरोबर स्पायनल फ्युजन किंवा इन्स्ट्रूमेंटेशन करण्यात आले. त्या 13 वर्षीय मुलीने ( नाव कुटुबियांच्या विनंतीवरून जाहीर करण्यात आलेले नाही)  25 फेब्रुवारी रोजी पाठीला आलेल्या कुबडाची तक्रार घेऊन भेट दिली होती.  तिच्या कुटुंबियांच्या ही गोष्ट ती वयाने 2 वर्षांची होती तेंव्हापासून लक्षात येऊ लागली होती.  या मुलीला मोठ्या प्रमाणावर पाठदुखी आणि श्वास घेण्यास अडचणीचा सामना करावा लागत होता. विशेषकरून खेळल्यानंतर किंवा वेगाने चालणे झाले की ही समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवत होती.तिचा एक्स रे काढल्यावर ही गोष्ट लक्षात आली की तिला स्कोलिओसिस ची समस्या आहे.

स्कोलिओसिस मध्ये मनुष्याच्या पाठीचा कणा हा एका बाजुला झुकतो विशेष करून लहान मुलांच्या वाढीच्या वयात हे घडू लागते.  स्कोलिओसिस हा आजार सधारणपणे सेलिब्रल पाल्सी  आणि मस्क्युलर डायस्ट्रोफी तर होतोच पण कधीकधी हा आजार पौगंडावस्थेतील आयडिओपॅथिक स्कोलोसिस मुळे होऊ शकतो,  कॉस्मेटिक समस्यांबरोबरच या समस्येने त्रस्त रुग्णांमध्ये आणखी समस्या असतात त्या म्हणजे कधीकधी फुप्फुसांवर बरगड्यांचा दबाव येतो त्यामुळे हृदय आणि फुप्फुसे दाबली जाऊन श्वास घेण्यास त्रास तर होतोच पण त्याच बरोबर हृदय ही नीट काम करू शकत नाही. 

गोव्यातील ग्राहकांसाठी मुंबईत 22 मार्च रोजी डाक अदालत

याविषयी माहिती देतांना मणिपाल हॉस्पिटल गोवा येथील ऑर्थोपेडिक स्पाईन स्पेशॅलिस्ट डॉ. सन्नी कामत यांनी सांगितले “ पाठीचा कणा म्हणजे मानेपासून ते कमरे पर्यंत एकमेकांवर रचलेली हाडे असतात.  जरी डोक्यापासून कमरेपर्यंत हा कणा असला तरीही तो कणा ताठ राहण्यासाठी आणि समतोल राखण्यासाठी खूप कमी जागा शिल्लक असते.  स्पायनल  स्कोलिओसिस म्हणजे ताठ राहण्यासाठी असलेल्या हाडांमध्ये दोष निर्माण होतो व हा कणा एका बाजूला कलतो. तिचा कणा इतका कलला होता की त्याचा ताण हृदय आणि फुप्फुसांवर पडत होता त्यामुळे तिला थोडे श्रम केल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होत होता.  हे कुबड खूप मोठे असल्यामुळे तिच्यावर स्पायनल डिफॉर्मिटी करेक्शन सर्जरी करणे आवश्यक होते.” 

गोव्यातील पंचायत सचिव पदांसाठी होणारी लेखी परीक्षा येत्या रविवारी

मणिपाल हॉस्पिटल गोव्याचे हॉस्पिटल डायरेक्टर मनीष त्रिवेदी यांनी सांगितले “ अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया या ऑर्थोपेडिक क्षेत्रातील खूप जटील आणि महत्त्वपूर्ण शस्त्रक्रियांपैकी एक मानली जाते.  सुयोग्य प्रमाणातील पायाभूत सुविधा तसेच प्रशिक्षित डॉक्टरांच्या चमू मुळे आम्ही अशा शस्त्रक्रिया यशस्वी करू शकलो व तिच्या मणक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करू शकलो.  शस्त्रक्रिया केल्यानंतर आम्ही रूग्णाला ७ दिवसात घरी पाठवले.  डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केल्या बद्दल मी डॉक्टरांचे अभिनंदन करतो. यामुळे या मुलीला आता आनंदी आणि आरोग्यपूर्ण जीवन प्राप्त झाले. ”

संबंधित बातम्या