'टेन्शन’ घेण्याचं कारणच नाही; रितेश नाईक यांची मोघम प्रतिक्रिया

Ritesh Naik defeated by one vote in ponda mayoral election
Ritesh Naik defeated by one vote in ponda mayoral election

फोंडा: Ponda Municipal Election फोंड्याचा(Ponda) नगराध्यक्ष(mayor) निवण्यासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत रितेश नाईक(Ritesh Naik) यांना केवळ एका मताने पराभव स्वीकारावा लागला, तरीपण शांत आणि संयमी रितेश नाईक यांनी हा पराभव सहज घेतला, ‘टेन्शन’ घेण्याचे कारणच नाही, अशी मोघम प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.(Ritesh Naik defeated by one vote in ponda mayoral election)

फोंड्यांचा नगराध्यक्ष निवडीवरून भाजप, मगो आणि गोवा फॉरवर्ड एकत्र आलेले असले तरी ही युती किती काळ टिकते, हे राजधानी पणजीतील भाजप नेत्यांवर अवलंबून आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शेवटी टीका करणाऱ्या मगो आणि गोवा फॉरवर्डचे सहाय्य भाजपच्याच फोंडा मंडळ अध्यक्षाने घेतल्याने त्यांच्यासाठी ही नामुष्की ठरली आहे. निवड झालेले नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर हे शांत स्वभावाचे आहेत, त्यांनी यात कोणत्याही पक्षाचे राजकारण नसल्याचे सांगितले आहे आणि पंधराही प्रभागात समान विकासकामे होतील याची ग्वाहीही दिली आहे. पालिकेत पक्षीय राजकारण असता कामा नये, असेही त्यांनी मत व्यक्त केले आहे.

निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्यानंतर काय होते, हे फोंड्यातील नगराध्यक्ष निवडणुकीवरून सत्ताधारी भाजपने बोध घ्यायला हवा. शांताराम कोलवेकर यांना ज्यांनी सहकार्य केले, त्यांच्यासह नूतन नगराध्यक्षांचे अभिनंदन.
- सुदिन ढवळीकर (मगो नेता, आमदार, मडकई)

फोंडा पालिकेत मागच्या वेळेला पालिकेत उपनगराध्यक्ष म्हणून संधी दिली, पण यावेळेला डावलले, त्यासंबंधी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो, पण अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे मगो आणि गोवा फॉरवर्ड समर्थक नगरसेवकांचे समर्थन मिळाल्याने निवडणुकीत उतरलो. भाजपने माझ्यावर अन्याय केला, तरीही पक्ष सोडणार नाही.

- शांताराम कोलवेकर (नगराध्यक्ष, फोंडा पालिका)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com