नदी परिवहन लेखाविभागात ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

सचिवालयात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने येथील कर्मचाऱ्यांनी मागील आठवड्यात आंदोलन केले होते. त्यामुळे राज्य सरकारने सचिवालयात ५० टक्के कर्मचारी कामावर येतील असा आदेश काढला. परंतु हा आदेश फक्त सचिवालयापुरता मर्यादित आहे.

पणजी: राज्यातील सचिवालयात फक्त ५० टक्के कर्मचारी कामावर येण्यास मुभा आहे. परंतु नदी परिवहन खात्याच्या लेखाविभागात कालपासून (सोमवारी) ५० टक्के कर्मचारी येत आहेत, त्यामुळे सध्या या विषया तर्कवितर्क व्यक्त होऊ लागले आहेत.

सचिवालयात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने येथील कर्मचाऱ्यांनी मागील आठवड्यात आंदोलन केले होते. त्यामुळे राज्य सरकारने सचिवालयात ५० टक्के कर्मचारी कामावर येतील असा आदेश काढला. परंतु हा आदेश फक्त सचिवालयापुरता मर्यादित आहे. तरीही दुसरीकडे नदी परिवहन खात्याच्या लेखा विभागाय कार्यालय प्रमुखाने ५० टक्के कर्मचारी कामावर येतील, असा आदेश काढला. तो आदेश काढताना कोणता कर्मचारी कोणत्या तारखेला कामावर असेल, ही माहिती दिली आहे.

या आदेशाची प्रत लेखापालांनी बंदर कप्तान खात्यास पाठवली आहे. सोमवारी (काल) हा आदेश काढल्याने मंगळवारी लेखा विभागाच्या कार्यालयात हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच कर्मचारी होते. लेखापालांनी काढलेल्या आदेशासाठी कोणाची परवानगी घेतली होती की नाही, याची चर्चा सध्या खात्यात सुरू आहे. नदी परिवहन खात्यात झालेल्या गैरव्यवहारामुळे लेखा विभाग चर्चेत आला आहे. आता आदेश काढून पुन्हा हे कार्यालय पुन्हा चर्चेत आले आहे.  

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या