राज्यातील नद्याही प्रदूषणाच्या विळख्यात

goa rivers
goa rivers

पणजी-  राज्यातील नद्या व भूजल प्रदूषित झाले आहे. याची दखल अनेक खटल्यांत राष्ट्रीय हरित लवादाने घेतली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानेही राज्यातील भूजल तपासासाठी साह्य केले असून अनेक ठिकाणी पाण्याचे नमुने गोळा करण्याची व्यवस्था राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली आहे. नद्यांतील पाणीही प्रदूषणापासून मुक्त नाही. मे ते सप्टेंबर या दरम्यान गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेल्या नद्यांतील पाण्याच्या नमुन्यांवरून नद्या प्रदूषित झाल्याचे दिसून आले आहे. 

राष्ट्रीय हरित लवाद आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला नियमितपणे याविषयी राज्यातून अहवाल पाठवण्यात येत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांची माहिती त्यात दिली जात आहे, असे असले तरी जल प्रदूषण काही कमी होण्याचे नाव घेत नाही, अशी स्थिती आहे.

प्रदूषित घटकांचे प्रती १०० मिलीमध्ये किती आहे, यावर प्रदूषणाची पातळी मोजली जाते. ‘क’ वर्गीय नद्यांत हे प्रमाण किती असावे, याचे निकष राष्ट्रीय पातळीवर ठरवले गेले आहे. 

नद्यांचे घेतले नमुने

राष्‍ट्रीय पातळीवरील निकषानुसार शापोरा नदीच्या पाण्याचे नमुने, हळर्ण किल्‍याजवळ, शिवोलीच्या पुलाजवळ, तेरेखोल नदीचे नमुने केरी येथे सिकेरी नदीचे कांदोळीच्या बाजूने, गणपती मंदिराजवळ, झुआरी नदीचे मडकई धक्क्याजवळ, बोरी पुलाजवळ, अस्नोडा नदीचे अस्नोडा येथे, वाळवंटी नदीचे साखळी येथे, खांडेपार नदीचे ओपा येथे, कोडली येथे, डिचोली नदीचे बाराजण येथे, मांडवी नदीचे टोंक माशेल येथे, तळपण नदीचे काणकोण येथे, साळ नदीचे खारेबांध येथे आणि मोबोर येथे पाण्याचे नमुने घेतले जात आहेत. या नमुन्यांतून या नद्यांतील पाणी प्रदूषित झाल्याचे दिसून आले आहे. त्याविषयीचा तपशीलवार अहवाल गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केला आहे. म्‍हापशातील तार नदीचेही पात्र प्रदूषित झाल्‍याबाबत बातम्‍या मागील काही महिन्‍यांपासून प्रसिद्ध होत आहेत. पालिकेनेही प्रदूषण दूर करण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू केले आहेत.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com