रस्ता अपघात: उत्तर गोव्‍यात ६०, दक्षिणेत ८५जणांच्या मृत्‍यूची नोंद

प्रतिनिधी
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

उत्तर गोव्यातील अकरा पोलिस स्थानकात यावर्षी ऑगस्ट २०२० पर्यंत नोंद झालेल्या रस्ता अपघातात ६० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये म्हापसा परिसरात सर्वाधिक १५ संख्या आहे. त्यापाठोपाठ डिचोली (७), पणजी (६) व हणजूण (६) याचा समावेश आहे. पणजी, म्हापसा व डिचोली येथे रस्ता अपघातातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. 

पणजी:  उत्तर गोव्यातील अकरा पोलिस स्थानकात यावर्षी ऑगस्ट २०२० पर्यंत नोंद झालेल्या रस्ता अपघातात ६० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये म्हापसा परिसरात सर्वाधिक १५ संख्या आहे. त्यापाठोपाठ डिचोली (७), पणजी (६) व हणजूण (६) याचा समावेश आहे. पणजी, म्हापसा व डिचोली येथे रस्ता अपघातातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. 

दक्षिण गोव्यात ८५ जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक फोंडा क्षेत्रात (२२) आहेत. गेल्यावर्षीही हे प्रमाण तेवढेच होते. याव्यतिरिक्त कोलवा (७), वास्को (९), कुंकळ्ळी (१०), वेर्णा (११), फातोर्डा (७) या पोलिस स्थानकाच्या क्षेत्रात रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. दाबोळी व मुरगाव पोलिस स्थानकाच्या क्षेत्रात यावर्षी आतापर्यंत एकाही रस्ता अपघात मृत्यूची नोंद झालेली नाही.  

राज्यातील पर्यटन तसेच खनिजवाहू ट्रकांचा व्यवसाय कोविड महामारीमुळे बंद होता. त्यामुळे रस्त्यावरील टुरिस्ट टॅक्सी तसेच ट्रकांची रहदारी कमी झाली होती. अजूनही खासगी प्रवासी बसेसचे प्रमाणही कमी आहे. राज्यात रस्ता अपघात हे अनेकदा भरधाववेगाने धावणाऱ्या ट्रकांमुळे घडल्याच्या घटना आहेत. रेंट ए बाईक घेऊन पर्यटकही या अपघातांना बळी पडले आहेत. रस्त्यांचा अंदाज नसल्याने व भरधाव अवजड वाहनांच्या धडकेने काहींना जीव गमवावा लागला आहे. देशी पर्यटकांचे प्रमाण पुढील महिन्यापासून वाढण्याची शक्यता आहे. खासगी प्रवासी बसेस अजून १५ टक्केच सुरू झाल्या आहेत. त्यामुळे व्यवसाय सुरू झाल्यास रस्ता अपघात प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत वाहतूक पोलिस विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केले. 

संबंधित बातम्या