'चांदर'चा रस्ता हवा सहा मीटर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 9 जानेवारी 2021

"चांदर येथे रेल्वे फ्लाय ओव्हर बांधण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र हे  काम आपल्या काळातील असून आपण आमदार होण्यापूर्वी १० वर्षापूर्वीचे आहे."

नावेली :  चांदर येथे रेल्वे फ्लाय ओव्हर बांधण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र हे  काम आपल्या काळातील असून आपण आमदार होण्यापूर्वी १० वर्षापूर्वीचे आहे. सदर पुल १२ मीटर दाखवण्यात आला असून स्थानिकांना आता ‘स्टेट हायवे’ रस्ता देखील १२ मीटर होईल, अशी भीती आहे. पूल बांधण्यास लोकांचा विरोध नाही, परंतु रस्ता ६ मीटर असावा, अशी मागणी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भविष्यात रस्ता १२ मीटर होणार नाही, याचे आश्वासन लोकांना द्यावे, अशी मागणी आमदार क्लाफासियो डायस यांनी केली.

संबंधित बातम्या