पेठेचावाडा देऊळवाडा कोरगाव रस्त्याची दुर्दशा

प्रतिनिधी
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

पेठेचावाडा ते देउळवाडा कोरगावपर्यंतच्या रस्त्याला मोठ-मोठे खड्डे पडले असून, या रस्त्याने वाहतूक करणे कठीण बनले आहे. या मार्गाने तुये, पार्से, मांद्रे व चोपडे जाण्यासाठी वाहनांची सतत वर्दळ असते. पण, सध्या या रस्त्याची वाहतूक करणे एक दिव्य झालेले आहे.

पेडणे: पेठेचावाडा ते देउळवाडा कोरगावपर्यंतच्या रस्त्याला मोठ-मोठे खड्डे पडले असून, या रस्त्याने वाहतूक करणे कठीण बनले आहे. या मार्गाने तुये, पार्से, मांद्रे व चोपडे जाण्यासाठी वाहनांची सतत वर्दळ असते. पण, सध्या या रस्त्याची वाहतूक करणे एक दिव्य झालेले आहे.

भाईड ते देउळवाडा कोरगावपर्यंत सुमारे पाच किलोमीटरचे अंतर आहे. अगोदरच या रस्त्याचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण झाल्यास बरीच वर्षे उलटली आहेत. त्यातच मोठी जलवाहिनी नेण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. त्यामुळे ह्या रस्त्याच्या दुर्दशेत आणखी भर पडली. गाडोळे, सुकाळे आदी भागात सार्वजनिक बांधकाम खात्याने दगड व माती टाकून काही खड्डे बुझविले होते. पण, पावसाळ्यात ते काही अवधीतच उखडून मूळ स्वरूप धारण केले. या रस्त्याने तुये, पार्से, मांद्रे व चोपडे येथे जाता येते. जलसिंचन खात्याने रस्त्याचे खोदकाम केल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्यात रक्कमही जमा केली आहे. रस्त्याच्या पुन्हा हॉटमिक्स डांबरीकरणाची निविदाही काढलेली आहे, असे असले तरी सध्या पावसाळा संपेपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या