रस्ते दुरुस्तीच्या फाईल्स वित्त खात्यात अडकतात: नीलेश काब्राल

राज्य सरकारला दिला घरचा आहेर
रस्ते दुरुस्तीच्या फाईल्स वित्त खात्यात अडकतात: नीलेश काब्राल
Nilesh CabralDainik Gomantak

पणजी: रस्त्यावरच्या खड्ड्यांबाबत गोवा खंडपीठाने गुरुवारी गंभीर दखल घेतली होती. या दणक्यानंतर सार्वजनिक बांधकाम खाते खडबडून जागे झाले आहे. यापुढे रस्त्यावर खड्डे दिसणार नाहीत अशी भूमिका शुक्रवारी घेतली. रस्ते दुरुस्तीच्या फाईल्स वित्त खात्यातून तातडीने मंजूर होऊन येत नाहीत असे सांगत साबांखा मंत्री नीलेश काब्राल यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला.

‘सध्या राष्ट्रीय महामार्ग 66 आणि राज्य महामार्गाच्या हॉट मिक्सिंगचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल. मात्र, मध्येच पडलेल्या अवकाळी पावसामुळे हे काम प्रलंबित करावे लागले. राष्ट्रीय महामार्ग 66 चे काम दोन टप्प्यात सुरू आहे. प्रामुख्याने उत्तर गोव्यातील काम एम.व्ही. राव या कंत्राटदाराकडे असून झुआरी पुलापासून पुढील काम दिलीप बिल्डकॉन यांच्याकडे आहे.

Nilesh Cabral
खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत श्रुंगी बांदेकरला 'सुवर्णपदक'

मात्र सध्या या सर्वच रस्त्याचे हॉट मिक्सिंग सुरू आहे. याशिवाय अनेक राज्य महामार्गाचेही काम सुरू आहे असेही ते म्हणाले. इमारती खोल्या आऊटसोर्स करणार सार्वजनिक बांधकाम खात्याकडे अनेक ठिकाणी महत्त्वाच्या जागा असून पणजी सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी राहण्यासाठी खोल्या आहेत. सध्या या मोकळ्या असून या खोल्या भाडेतत्त्वावर देण्याचा सरकारचा विचार असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. त्या दुरुस्त करून बाहेरील लोकांना भाडेतत्त्वावर दिल्यास ज्याच्यातून सरकारला मोठा महसूल मिळेल. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रयत्न असल्याची माहिती मंत्री काब्राल यांनी दिली आहे.

Nilesh Cabral
वादळी वाऱ्याचा फोंड्यात फटका, तर कुडणेत घरावर कोसळली वीज

यापुढे खड्डे दिसणार नाहीत : अवकाळी पावसामुळे डागडुजीचे काम रखडले होते. पण यापुढेही राष्ट्रीय महामार्ग आणि राज्याच्या ताब्यातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरूच ठेवले जाणार आहे. यापुढे रस्त्यावर खड्डे दिसणार नाहीत असे मंत्री काब्राल यांनी सांगितले.

खड्डे दिसल्यास अभियंते जबाबदार

रस्ते दुरुस्तीसाठी आणि कामाची निविदा व नमूद रक्कम योग्य आहे का? हे ठरविण्यासाठी चार तज्ज्ञांची कमिटी बनविण्यात आली आहे. ती या कामांवर लक्ष ठेवून असेल. याशिवाय संबंधित विभागाने दिलेले अर्थ खात्याचे बजेटचे पुनरावलोकन करेल. यापुढे रस्त्यावर खड्डे दिसल्यास संबंधित कार्यकारी अभियंते यांना जबाबदार धरण्यात येईल असेही मंत्री काब्राल यांनी जाहीर केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com