सादोळशेत रस्त्यांचे काम सुरु

Dainik Gomantak
शुक्रवार, 8 मे 2020

सादोळशे येथील पायतोड व हिंदू स्मशानभूमीकडे जाणाऱ्या  रस्त्याचा प्रस्ताव सरकारकडे मंजूरी साठी पाठवण्यात आला होता उपसभापतीनी त्याचा पाठपूरावा करून या रस्त्याच्या बांधणीस मंजूरी मिळवून दिल्याचे स्थानिक पंच विपीन प्रभूगावकर यानी सांगितले.

 

काणकोण

काणकोणचे आमदार उपसभापती इजिदोर  फर्नाडीस यांच्या हस्ते सादोळशे येथे दोन रस्त्यांच्या कामास सुरवात झाली. या दोन्ही रस्त्याची बांधणी पैगीण पंंचायतीच्या निधीतून करण्यात येणार आहे.तीन वर्षापूर्वी सादोळशे येथील पायतोड व हिंदू स्मशानभूमीकडे जाणाऱ्या  रस्त्याचा प्रस्ताव सरकारकडे मंजूरी साठी पाठवण्यात आला होता उपसभापतीनी त्याचा पाठपूरावा करून या रस्त्याच्या बांधणीस मंजूरी मिळवून दिल्याचे स्थानिक पंच विपीन प्रभूगावकर यानी सांगितले. यावेळी उपसभापती फर्नाडीस यानी सादोळशे येथील श्री मोहीनी देवालयाकडे जाणाऱ्या रस्त्यासहीत अन्य ग्रामीण रस्त्याचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यात येणार निविदा जाहीर होऊन कंत्राटदाराला  वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे रस्त्याचे डांबरीकरण काम १५ मे पूर्वी करणे बंधनकारक आहे त्यासाठी कंत्राटदाराला पावसाळा संपल्यानंतर डांबरीकरण करण्यास सांगितले आहे.गावच्या विकास कामासाठी सर्वानी आपसातील मतभेद विसरण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.या वेळी सरपंच जगदीश गावकर, उपसरपंच एल्डा फर्नाडीस,पंच विपीन प्रभूगावकर रूद्रेश नमशीकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या