रस्‍त्‍यांची डागडूजी आठवडाभरात

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

रस्ते दुरुस्तीचे काम राज्यभरात काम आठवडाभरात हाती घेतले जाणार आहे. हॉटमिक्स डांबरीकरणाचे आदेश देण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी आज पर्वरी येथे दिली

पणजी :  रस्ते दुरुस्तीचे काम राज्यभरात काम आठवडाभरात हाती घेतले जाणार आहे. हॉटमिक्स डांबरीकरणाचे आदेश देण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी आज पर्वरी येथे दिली. यासाठी दोनशे कोटी रुपये सरकार खर्च करेल असे ते म्हणाले.

ते म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा मुख्य मार्ग, मुख्य मार्ग, अंतर्गत रस्ते यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे. सेवा रस्ते काँक्रिटचे केले जातील. या सर्व कामांची हमी १० वर्षांची असेल. दरवर्षी रस्त्याची तोच कंत्राटदार देखभाल दुरुस्ती करेल. त्यासाठी त्याच्याकडून सुरक्षा ठेव घेतली जाणार आहे. निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. सर्व रस्त्यांवरील केवळ खड्डेच बुजवले जाणार नसून पूर्णतः डांबरीकरण केले जाणार आहे. आठवडाभरात हे काम हाती घेतल्याचे दिसून येईल.

मोलेतील वीज वाहिनी, रस्ता व लोहमार्ग रुंदीकरण हे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजेत. राज्याच्या हिताचे ते प्रकल्प आहेत. कोळसा वाहतूक कित्येक वर्षे सुरू आहे. त्याचा व या प्रकल्पांचा काहीही संबंध नाही, असे त्यांनी सांगितले. रस्ता रुंदीकरणावेळी धूळ प्रदूषण होऊ नये, याची काळजी घेण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या