जुन्या गोव्यातील चर्चच्या कार्यालयात चोरी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

या चोरीची माहिती सकाळी कार्यालय उघडल्यानंतर उघडकीस आली. चर्चचे हे कार्यालय जुने गोवे पोलिस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर आहे.

पणजी- जगात प्रसिद्ध असलेल्या जुने गोवे येथील चर्चच्या कार्यालयात चोरी झाल्याची घटना काल घडली. चोरट्यांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास चोरी करून
 सुमारे ५५ हजारांची रोकड लंपास केली. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. 

चोरट्यांनी या कार्यालयाच्या खिडकीचे लोखंडी गज तोडून आत प्रवेश केला. या चोरीची माहिती सकाळी कार्यालय उघडल्यानंतर उघडकीस आली. चर्चचे हे कार्यालय जुने गोवे पोलिस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर आहे. ठसे तज्ज्ञांमार्फत तेथील वस्तूंवरील हाताच्या बोटांचे ठसे घेण्यात आले. श्‍वान पथकाला पाचारण करून चोरट्यांचा मागोवा पोलिसांनी घेण्याचा प्रयत्न मात्र त्यात फारसे यश आले नाही.

संबंधित बातम्या