म्हापसा मार्केटमध्ये ‘पार्किंग’च्या नावाने लूट

व्यापारी संघटनेची तक्रार : मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; कंत्राटदारावर कारवाईची मागणी; दरफलक उभारण्याची मागणी
Pay and parking issue
Pay and parking issueDainik Gomantak

म्हापसा: येथील पालिका मार्केटमध्ये पार्किंगच्या नावाखाली कंत्राटदार जास्त पैसे वसूल करीत असल्याचा आरोप करत म्हापसा व्यापारी संघटनेने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
म्हापसा व्यापारी संघटनेने या निवेदनात म्हटले आहे की, बाजारपेठेत शिस्त यावी, यासाठी संघटनेने या पार्किंग प्रणालीस पाठिंबा दिला होता, जेणेकरून ग्राहकांना बाजारात गाड्या पार्किंगसाठी जागा मिळावी.

(Robbery in the name of 'parking' in mapusa market)

Pay and parking issue
फोंड्यात वाहतूक व्यवस्थेचे तीन-तेरा

शिवाय विक्रेत्यांकडून अनधिकृतपणे रस्ते व्यापले जाणार नाहीत याची खबरदारी म्हणून ही प्रणाली सुरू केली होती. याप्रकरणी सीताराम सावळ यांनी मुख्याधिकारी या नात्याने लक्ष घालून, संबंधित कंत्राटदारावर आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. कंत्राटदाराने पालिकेने निश्चित केलेल्या दरानेच हे पार्किंग शुल्क आकारावे, असे त्यास निर्देश द्यावेत. शिवाय बाजारपेठेतील प्रमुख ठिकाणी पार्किंग दराचे फलक ठळकपणे उभारावेत, अशी मागणी म्हापसा व्यापारी संघटनेतर्फे अध्यक्ष श्रीपाद सावंत आणि सचिव सिद्धेश राऊत यांनी केली आहे.

- पाचवरून थेट दहा रुपये शुल्क
सध्या बाजारपेठेत कंत्राटदार हा दुचाकी पार्किंगच्या नावाखाली जास्त पैसे उकळत असल्याच्या तक्रारी येताहेत. मार्केटमध्ये दोन तासांसाठी दुचाकीसाठी ५ रुपये शुल्क आहे. मात्र, हा कंत्राटदार लोकांकडून 10 रुपये वसूल करतो. आणि याप्रश्नी लोकांनी जाब विचारल्यास पालिकेने हे दर बदलल्याचे तो सांगतो. हा प्रकार अयोग्य आहे. मागील कित्येक वर्षे बाजारपेठेत पार्किंग सुरू आहे. यापूर्वीचा कंत्राटदार दुचाकीचालकांकडून केवळ ५ रुपयेच आकारायचे, याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे.

मार्केट परिसरात दुचाकी पार्किंगला दोन तासांसाठी 5 रुपये शुल्क आहे. या काळानंतर अतिरिक्त वेळेसाठी 5 रुपये. तर चारचाकींना दोन तासांसाठी 10 रुपये शुल्क आहे. मात्र, कंत्राटदाराच्या या प्रकाराची मी माहिती घेत आहे. यासाठी मी कंत्राटदारालासुद्धा पालिकेत बोलावून घेतले आहे.
- शुभांगी वायंगणकर, नगराध्यक्षा, म्हापसा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com