Dudhsagar Falls: 'दूधसागर' परिसरात पर्यटकांची लूट; गैरप्रकारांवर निर्बंध घालणे गरजेचे

कुळे गावातील मोजक्याच लोकांना वन खात्याने फॉरेस्ट गाईड म्हणून परवाना दिलेला आहे.
Dudhsagar Falls
Dudhsagar FallsDainik Gomantak

Dudhsagar Falls: दुधसागर धबधबा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशी पर्यटक कुळे गावात येतात. ट्रॅकिंगसाठी हवी तेवढी रक्कम सांगून त्यांना ट्रॅकिंगला जाण्यासाठी तयार करतात. त्यांच्याकडून भरमसाट पैसे आकारले जात असल्याने दुधसागर धबधबा म्हणजे पर्यटकांची लूट असेच चित्र सध्या कुळे गावात पाहायला मिळते. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत.

बेकायदा, नियमांचे उल्लंघन करून पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी रेल्वे रूळावरून पोचतात, त्याकडेही पोलिसांचे दुर्लक्ष होते. तर काही वेळेला पर्यटकांकडून पैसे घेऊन सोडले जाते. परवाना नसलेले गाईड या ठिकाणी कार्यरत आहेत, त्यामुळेही दुर्घटना घटतात, अशा गैरप्रकारांवर निर्बंध घालणे गरजेचे आहे, असे स्थानिकांचे मत आहे.

Dudhsagar Falls
Goa Dairy : गोवा डेअरीच्या एमडी नियुक्तीवरून सरकारची कानउघाडणी

मिळालेल्या माहितीनुसार कुळे गाव ते दुधसागर धबधबा साधारण 12 ते 13 कि. मी आहे. कुळेहून अभयारण्यात जाताना सर्व राखीव जंगलातील पाण्यातील ओहळ पार करून व वाट जंगलातून काढीत दुधसागर गाठावे लागते. या भागात पाऊस जास्त पडत असल्याने ओहळात पुष्कळ पाणी येते त्यामुळे लाईफ जॅकीट न घेताच गेलेल्या पर्यटकांना आपल्या जीवाची योग्य खबरदारी घ्यावी लागते. गेल्या काही वर्षामागे ओहोळातून चार जण वाहून गेले होते, ते कसेबसे पाण्यातून वर आले. तद्‍नंतर आणखी काही दिवसांनी पर्यटक ओहोळातून जाताना पाणी जास्त आल्याने एक महिला पर्यटक वाहून गेली. चार दिवसांनी त्याचा मृतदेह मिळाला तेव्हाही त्याच्या अंगात लाईफ जॅकीट नव्हते, अशी माहिती येथील सूत्रांनी दिली.

Dudhsagar Falls
Goa Rain Impact: हातातोंडाशी आलेल्या भाजीपाल्याची नासाडी, पावसामुळे शेतकरी चिंतेत

कुळे गावातील मोजक्याच लोकांना वन खात्याने फॉरेस्ट गाईड म्हणून परवाना दिलेला आहे. पण परवाना नसलेले अनेक लोक गाईड बनून पर्यटकांना घेऊन जातात व त्यांच्याकडून भरमसाठ पैसे आकारतात. जेव्हा पर्यटक बुडण्याची घटना घडते, तेव्हा हे गाईड पळून येतात आणि ‘तो मी नव्हेच’ असे करून गप्प राहतात. अशा वेळी कुठल्याच सेटिंगमध्ये नसलेल्या स्थानिक पोलिसांना मात्र बुडालेल्या पर्यटकांचा शोध घेण्यास जावे लागते. तेव्हा हे गाईड पोलिसांना सहकार्य करण्यास येत नाहीत, उलट दूर राहून ‘तो मी नव्हेच’ ही भूमिका घेऊन राहतात.

फॉरेस्ट मध्ये प्रवेश तिकीट न घेता पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी आलेले आढळून येता, तेव्हा कुणाला तरी चिरीमिरी देऊन हे पर्यटक या ठिकाणी पोचले असल्याचे लक्षात येते. त्यामुळे पावसाळ्यातील दुधसागर धबधबा म्हणजे गाईड, आरपीएफ व रेल्वे कर्मचारी यांचे सेटिंगचा शब्द सरार्सपणेऐकायला मिळतो. पावसाळ्यात दुधसागर धबधब्याला मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने धबधब्यावरून पडणाऱ्या पाण्याचे दृश्य पाहण्यासारखे आहे. त्यामुळे छुप्या पद्धतीने अनेक पर्यटक तेथे पोचतात.

Dudhsagar Falls
Goa Politics: BJP सोडून काँग्रेसचा हात धरणारे दिगंबर कामत पुन्हा भाजपात

लक्ष देण्याची गरज: दुधसागर धबधबा हा जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी नाना तऱ्हेचे पर्यटक, प्रशासकीय अधिकारी येत असतात रेल्वेच्या पुलावर असलेल्या कॅंटीन व विसावा घेण्यासाठी बांधलेल्या निवाऱ्याच्या बाजूला कचराच कचरा जमा झाला आहे. काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. त्याकडे संबंधित रेल्वे खाते व पर्यटन खात्याचेही दुर्लक्ष झाले आहे.

Dudhsagar Falls
Goa Congress Rebel : काँग्रेस आमदारांच्या भाजप विलिनीकरणाला विधानसभा सभापतींची मंजुरी

पंचायतीचा महसूल बुडाला: पूर्वी पावसाळ्यात ट्रॅकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांना लाईफ गाईड जॅकेट देत होते. आता जॅकेट न घेताच पर्यटक ट्रेकिंगसाठी जात असतात. त्यामुळे कुळे-शिगाव पंचायतीला मिळणारा महसूल बुडतो. तेव्हा पंचायतींनेही विषय गांभीर्याने घ्यावा, असे ग्रामस्थाचे मत आहे. आमदार, पर्यटक खाते, पंचायत मंडळ, पोलिस यांची संयुक्त बैठक घेऊन येथील पर्यटन सुरळीत करावे, असे मतही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com