गोव्यात सेनिटाईझेशनसाठी रोबोटची अभिनव निर्मिती
Robots for sanitation in GoaDainik Gomantak

गोव्यात सेनिटाईझेशनसाठी रोबोटची अभिनव निर्मिती

25 मिनिटांत डिसइनफॅक्शन स्प्रिंग सिस्टमद्वारे भिंती सेनिटाईझ करु शकतो

फातोर्डा: फातोर्डा येथील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलॅक्ट्रॉनिक्स व टेलेकॉम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी सेनिटाईझेशनसाठी रोबोटची अभिनव निर्मिती केली आहे.

हा एक चालता रोबोट असुन तो फरशी व भिंतीवर औषधाचे फवारे करु शकतो. हो रोबोट पंधरा मिनिटात इनडोअर, प्रयोगशाळा, बंद खोल्या तर 25 मिनिटांत डिसइनफॅक्शन स्प्रिंग सिस्टमद्वारे भिंती सेनिटाईझ करु शकतो.

 Robots for sanitation in Goa
Goa-Karnataka 'सागर शक्ती' नौकानयन मोहिमेला मुख्यमंत्र्यांनी दाखवला झेंडा

हा रोबोट माणसांसाठी एकदम सुरक्षित असुन तो सलग आठ तास स्वच्छतेचे काम करु शकतो. या रोबोटला कॅमेरा बसवलेला असुन त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवता येते. ही माहिती हा प्रकल्प पुर्ण केलेल्या विवेक खाडीलकर, साईल कामत, दृष्टी नाईक यानी दिली. त्यांना मिशेल आरावजो व मोहिनी नाईक या प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले.

या रोबोटचा वापर बंद कचेऱ्या, व्यापारी संकुल, सार्वजनिक ठिकाण, इस्पितळात करु शकतात. एकदा चालना दिल्यावर हा रोबोट कुणाच्याही मदतीशिवाय काम करु शकतो असे सांगण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्र्वजीत राणे यानी या रोबोट उपक्रमाची प्रशंसा केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com