Rohan Khaunte : शिगमोत्सवातून परंपरांचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न

खंवटे : ‘पणजी शिगमोत्सव’च्या वास्तूचे उद्‌घाटन
Rohan Khaunte
Rohan KhaunteGomantak Digital Team

शिगमोत्सव व कार्निव्हल हेच पर्यटकांच्या दृष्टीने गोव्याचे उत्सव असा समज असला तरी गोव्याची संस्कृती फार मोठी आहे. पुरातन परंपरांचे दर्शन शिगमोत्सवातून घडवावे, यासाठी पर्यटन खाते प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी येथे केले.

पणजी शिगमोत्सव समितीच्या सांतिनेज कामत ग्रँडमधील नव्या वास्तूचे फित कापून उदघाटन केल्यानंतर मंत्री खंवटे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे ,समितीचे मानद अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, कार्याध्यक्ष मंगलदास नाईक, सचिव शांताराम देसाई व कोषाध्यक्ष संदीप अनंत नाईक उपस्थित होते.

Rohan Khaunte
Mapusa Municipality : म्हापशात माॅन्‍सूनपूर्व कामे संथगतीने, गटारांतील गाळ रस्‍त्‍यांवर

रोहित मोन्सेरात यांनी पणजी शिगमोत्सव समितीच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून अभिनंदन केले. सदानंद तानावडे म्हणाले की, गोव्यात इतरत्र आमदार बदलले की, शिगमोत्सव समित्या बदलतात. पण पणजी समिती अपवाद आहे. कारण या समितीचे कार्य शिस्तबद्ध असून स्वतःची वास्तू या समितीने घेतली आहे.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी विष्णू सुतार, अविनाश शिंदे, अब्दुल्ला खान, अमोल कांबळे यांचा सन्मान करण्यात आला. सिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. शांताराम नाईक यांनी आभार मानले.

Rohan Khaunte
Go First Airlines Crisis: आर्थिक दिवाळखोरीत असलेले 'गो फर्स्ट' पुन्हा विमानसेवा सुरु करण्याच्या तयारीत

सुवर्णक्षण !

पणजीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा, असा आजचा क्षण आहे. निधी साठवून ही सुंदर वास्तू समितीने घेतली आहे. समिती एकदिलाने काम करत असून, संस्कृती वाढीस लावण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

श्रीनिवास धेंपे, मानद अध्यक्ष पणजी शिगमोत्सव समिती

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com