Rohan Khaunte: गोव्याचे माहिती तंत्रज्ञान रोहन खंवटे म्हणतात; रामायण महाभारत महत्वाचे ग्रंथ

रूग्णाश्रयाच्या वर्धापनदिनी ज्येष्ठ नागरिक मनोरंजन केंद्राचा शुभारंभ
Goa Tourism | Rohan khaunte
Goa Tourism | Rohan khaunteDainik Gomantak

पणजी: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आज नात्यांतील संवाद, आमची संस्कृती आपण कुठे तरी हरवत चाललो आहोत. संस्कृती टिकवून ठेवण्याच्या आम्ही गोष्टी करतो पण ती टिकवायची कुणी हा खरा प्रश्न आहे. खरे तर आजच्या घडीची ही शोकांतिका आहे असून आमचा समृध्द संस्कृतीचा वारसा जपणे हे आमचे कर्तव्य असून ती जपण्यासाठीच आज एकत्रित समाजाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन पर्यटन तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी केले.

(Rohan Khanwte asserts that culture will last if there is communication in relationships)

Goa Tourism | Rohan khaunte
Goa Politics: गुरू शिष्याचे एकमत 'खरी कुजबुज'

मातृछाया संचालित काबेसा बांबोळी येथील रूग्णाश्रय संस्थेच्या १५व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ज्येष्ठ नागिरिकांसाठीच्या मनोरंजन केंद्राचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निमंत्रित पाहुणे व ज्येष्ठ नागरिक उमेश बुडकुले, स्थानिक आमदार रूडॉल्फ फेर्नांडीस, मातृछायेचे अध्यक्ष अनुप केणी, शिरीष आमशेकर, रूग्णाश्रयाच्या प्रमुख डॉ. शशिकला सहकारी आदी उपस्थित होते.

रामायण, महाभारत हे आपल्या जीवन संस्कृतीचे महत्वाचे ग्रंथ आहेत. समाज जीवनाच्या वाटचालीचे ते मार्गदर्शक आहेत. पण, नव्या पिढीला त्याची माहितीच नाही अशी स्थिती आहे. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे पुराण कालीन कथा पोचणे आज अवघड का बनले आहे याचा विचार केल्यास हरवलेला नातेसंवाद हेच उत्तर मिळेल. आपली संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोचविण्याचे महत्वाचे कार्य करण्याची ताकद जुन्या पिढीत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन व्हायला हवे. म्हणजे त्यातून ज्येष्ठ नागरिक व नव्या पिढीतील संवाद सुधारेल. त्यामुळे ज्येष्ठांचे जीवन तर सुखकर होईलच व त्याच बरोबर नव्या पिढीलाही जीवनाच्या वाटचालीची योग्य दिशा असे खंवटे म्हणाले.

ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणण्याच्या हेतूने पर्वरीत भजन परंपरा सुरू केल्याचे खंवटे यांनी सांगितले. आज वेगवेगळ्या मंदिरात त्यांचे भजन सादर होते. ज्येष्ठ नागरिक त्यामुळे एकत्र आले. हे मॉडेल राज्याच्या सर्व भागात सुरू व्हायला हवे. कारण ज्येष्ठांना एकत्र आणून आम्ही त्यांना समाधानाचे जीवन देऊ शकू असे ते म्हणाले. आज राज्यासमोर अनेक आव्हाने आहेत. पण आपण सर्वांनी एकत्र येऊनच गोव्याच्या हिताचा विचार करायला हवा. आमच्या विचार मंथनातूच नवा गोवा घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा व नव्या पिढीतील संवाद सध्या हरवत चालला आहे. हे योग्य नव्हे असे सांगून हे का होते त्याचा विचार व्हायला हवा असे खंवटे म्हणाले. सध्याची पिढी ही नव्या तंत्रज्ञानात घुसवलेले डोके वर काढू बघत नाही. त्यामुळेच त्यांच्याकडे घरातील ज्येष्ठ सदस्यांशी संवाद साधण्यासाठी पुरेसा वेळ नाही. हे चित्र बदलण्याची गरज आहे. तसे झाले तरच आपला समाज सुधारेल व आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही नवी गती घेईल असे ते म्हणाले.

Goa Tourism | Rohan khaunte
Goa Crime News: नेसाइ येथील खुन प्रकरणी दीकरपाली येथील संशयित आरोपी गजाआड

बालपण हा आमच्या जीवनातील सर्वांत आनंदाचा भाग आहे. पालक आपल्यावर सदोदीत चांगले संस्कार करतात व त्यातून आपण घडत असतो. बालपणी आपण अज्ञान असतो व अनेक गोष्टींचे आपल्याला गांभीर्यही नसते. म्हणून अनुभवी पालकांचे म्हणणे ऐकून जीवनाची वाटचाल केल्यास ती सोपी बनेल असे त्यांनी नव्या पिढीला उद्देशून पुढे बोलताना सांगितले.

रूग्णाश्रयाचे होम नर्सिंग केंद्र महत्वाचे आहे. आजच्या धावपळीच्या युगात ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासही वेळ नाही अशी समाजाची स्थिती आहे. ही नाळ ओळखून होम नर्सिंगच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याबाबत समाजात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे कामही रूग्णाश्रयाने केल्यामुळे विश्वस्त संस्थेचे त्यांनी कौतुक केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com