पणजीच्या महापौरपदी रोहित मोन्सेरात तर उपमहापौरपदी वसंत आगशीकर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 29 मार्च 2021

पणजीच्या महापौरपदी रोहित मोन्सेरात यांचे तर उपमहापौरपदी वसंत आगशीकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ही माहिती दिली.

पणजी: पणजीच्या महापौरपदी रोहित मोन्सेरात यांचे तर उपमहापौरपदी वसंत आगशीकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ही माहिती दिली.

पणजी महापालिकेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनेलने 30 पैकी 25 जागा जिंकल्या आहेत.रोहित हे पणजी चे आमदार आतनासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांचे पुत्र आहेत. त्याने लढवलेली ही पहिलीच निवडणूक होती. बाबूश यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात या राज्याच्या महसूल मंत्री आहेत. आमदारकीचा राजीनामा न देता काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दहा आमदारा़त बाबूश आणि जेनिफर यांचा समावेश आहे.

Corona Update: गोव्यात होळी, ईद, इस्टरच्या  आधी  कलम 144 लागू 

या दहा आमदारांविरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांच्यासमोर सादर केलेल्या अपात्रता याचिकेचा निकाल सभापतींनी राखीव ठेवलेला आहे. या प्रकरणी चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर आता सहा एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. पण जीतून स्व मनोहर पर्रीकर हे आमदार म्हणून निवडून येत असतानाही महापालिकेवर मोन्सेरात यांचीच सत्ता होती.आता मोन्सेरात भाजपमध्ये आल्याने भाजपचा  आमदार आणि महापालिकाही भाजपकडे असे समीकरण तयार झाले आहे.

Holi 2021: आपल्याला रंगांची एलर्जी असेल तर या टिप्स वापरुन पहा; आणि करा त्वचेच रंक्षण 

संबंधित बातम्या