पणजी बसस्थानकाचे पत्रे उडालेलेच!

दुरवस्था : गतवर्षी तौक्ते वादळामुळे नुकसान, महामंडळाला जाग कधी येणार?
Panaji bus stand
Panaji bus standDainik Gomantak

पणजी : एकीकडे पणजीला स्मार्ट शहरांमध्ये समाविष्ट करण्याचा घाट सरकारने घातला आहे. विविध प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत, मात्र सर्वसामान्यांच्या गरजेचे असलेलेल्या पणजी बसस्थानकाची स्थिती बकाल अवस्थेत आहे.

बस स्थानकावरील पत्रे उडलेल्या स्थितीत आहे. तोक्ते वादळामुळे गेल्या वर्षी बसस्थानकाचे नुकसान झाले होते. वर्षभरानंतरही सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधींने येथील स्थितीचा आढावा घेतला असता धक्कादायक चित्र पुढे आले आहे.

Panaji bus stand
रोजगार देण्‍यास सरकार अपयशी

राज्यातील अनेक नागरिक कामाच्या निमित्ताने पणजीत येतात. परराज्यातील तसेच आंतराष्ट्रीय नागिरक पर्यटनाच्या अनुषंगाने राजधानीत प्रवास करतात. मात्र पणजीतील कदंबा बसस्थानकाची दुरवस्था पाहून हे राजधानीतील बसस्थानकच ना?

असा सवाल त्यांना उपस्थित होतो. गेल्या वर्षी मे महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने राज्यात प्रचंड नुकसान केले. कदंबा बसस्थानकात प्रवाशांना थांबण्यासाठी ज्या शेड बांधल्या आहेत, त्याचे पत्रे उडाले आहेत. दुसरा मान्सून जवळ आला, तरी या शेडची डागडुजी केलेली नाही.

पत्रेही बदलले नाही. प्रशासन अजूनही डोळझाकच करीत राहणार काय, असे नागरिकांनी म्हटले. पणजी बसस्थानक अनेक समस्यांचे आगार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि अपुरे नियोजन यामुळे पावसाळ्यात जर कदंब बसस्थानकाची डागडुजी करणे शक्य नसेल, तर प्रवाशांचा पावसापासून संरक्षण व्हावे.

त्यांना निवारा मिळावा. यासाठी किमान पत्रे तरी घालावेत. कारण पावसाळ्यात जर शेडवर पत्रे नसतील, तर छत्री घेऊनच प्रवाशांना बसची वाट पाहावी लागणार आहे. बस येईपर्यंत प्रवाशांना सुखाने निवांतपणे बसस्थानकात आसरा घेता येऊ नये का? अशी संतप्त प्रतिक्रिया मनोज नामक प्रवाशाने व्यक्त केली.

बेशिस्त पार्किंग : बसस्थानकावर पे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. मुळात येथे जागाच कमी असलेल्याने अनेकांना आपल्या गाड्या पार्क करता येत नाहीत. त्यामुळे मिळेत त्या जागी गाड्या पार्क केल्या जातात. त्यामुळे पादचाऱ्यांनी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. तसेच पार्क केलेल्या दुचाकी काढतानाही नाकी नउ होते.

कचरापेटी कुठे; पाणी विकतच घ्या..

कोणत्याही बसस्थानकावर मुलभूत सुविधा असायला हव्यात. पणजी बसस्थानकावर मात्र त्याची कमतरता आढळून आली. पाण्याची बाटली विकत घेतली असता ती टाकायची कुठे असा प्रश्न प्रतिनिधीपुढे उपस्थित राहिला. ही बाटली कचरा पेटीत टाकण्यासाठी जवळपास अर्धा किलोमीटरची फेरी मारावी लागली.

बसस्थानकावर काही अंतरावरच कचरा पेटी हव्यात तसेच पिण्याची मोफत असायला हवी. अशी व्यवस्था बसस्थानकावर दिसली नाही. महामंडळाने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com