अभिनव विद्यामंदिर शाळेला रोटरी क्लबतर्फे इन्व्हर्टर प्रदान 

प्रतिनिधी
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

मोले येथील अभिनव विद्यामंदिर मोले, शाळेला रोटरी क्लब ऑफ फोंडा न्यू जनरेशन तर्फे दि. १८ ऑगस्ट २०२० रोजी इन्व्हर्टर प्रदान करून शिक्षण समुहाच्या वाटचालीत मोठे योगदान दिले आहे. 

धारबांदोडा: मोले येथील अभिनव विद्यामंदिर मोले, शाळेला रोटरी क्लब ऑफ फोंडा न्यू जनरेशन तर्फे दि. १८ ऑगस्ट २०२० रोजी इन्व्हर्टर प्रदान करून शिक्षण समुहाच्या वाटचालीत मोठे योगदान दिले आहे. 

शाळेला अनियमित विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. ज्यामुळे शिक्षण संचालनालयातर्फे पाठवण्यात येणाऱ्या ऑनलाईन पत्रकांना लवकर उत्तर देण्यास विलंब होत होता. या कार्यक्रमाला निव जनरेशनचे चेअरमन ओंकार कामत सांबारी, अध्यक्ष मुल्ला, खजिनदार महेश नायर तसेच भाऊसाहेब बांदोडकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आपा गांवकर, सचिव मनोज गांवकर, व्यवस्थापक रमेश नाईक, शाळेचे मुख्याध्यापक अशोक देसाई, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 

शाळेला उपयुक्त असे साधन मिळवून देण्याविषयी महत्वाचे योगदान दिलेले शिक्षक यशवंत बांदोडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

संबंधित बातम्या