Goa Lockdown: किरणपाणी आणि न्हयबागचे मार्ग 31 मे पर्यंत ‘सील’            

Goa Lockdown: किरणपाणी आणि न्हयबागचे मार्ग 31 मे पर्यंत ‘सील’            
goa raods.jpg

मोरजी: किरणपाणी-आरोंदा (Aronda) व न्हयबाग-सातार्डा हे दोन्ही नाके पूर्णपणे ‘सील’ केले असून कोणालाही नकारात्मक दाखला (Covid-19 Negative Report) किंवा ई-पास (E-Pass)असला तरीही प्रवेश दिला जाणार नाही. हा प्रकार १४ पासून सुरू केला व दोन्ही नाक्यावर पोलिस तैनात करण्यात आले. दोन्ही नाक्याला तातडीने पोलिस अधीक्षक पेडणे पोलिस (Police) निरीक्षक जिवबा दळवी यांनी भेट देऊन पोलिसांना महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या.

आता 31 मे पर्यंत कर्फ्यू (Lockdown) वाढवल्यामुळे आता या दोन्ही चेक नाका बंदच राहणार आहे. सध्या या जागी पोलिस तैनात आहेत आणि कोणालाही प्रवेश देत नाहीत. तसेच कर्फ्यूचा पालन आता लोक करताना दिसता आहेत. 

किरणपाणी(Kiranpani) - आरोंदा आणि सातार्डा न्हयबाग हे दोन्ही नाके सर्व वाहनांसाठी आणि नागरिकांना ये-जा करण्यासाठी पुढील आदेश येईपर्यंत 14 पासून बंद केले आहे. केवळ राष्ट्रीय महामार्ग 66 (National Highway No. 66) वरील पत्रादेवी हाच चेक नाका सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी नागरिकांना प्रवेश देण्यासाठी खुला असणार आहे.

याच नाक्यावर राज्यातून (Goa) बाहेर जाताना ई-पास तर बाहेरून राज्यात येणाऱ्यांना कोरोना नकारात्मक दाखला घेऊन यावा लागेल, तरच प्रवेश दिला जाईल. मात्र हे दोन्ही परवाने असले तरीही किरणपाणी व न्हयबाग या नाक्यावरून कोणालाच येत-जाता येणार नाही. या घटनेमुळे वाहतूकदार व कामगार जे राज्यात, आरोंदा, शिरोडा, सातार्डा, सातोसे या भागातील नागरिकांना थेट पत्रादेवी नाक्यावर येऊनच त्या-त्या भागात नियोजित स्थळी जावे लागणार आहे. केरी, पालये, किरणपाणी, हरमल, तेरेखोल या भागातील नागरिक महाराष्ट्र, आरोदा, शिरोडा या भागात कामानिमित्ताने व्यवसाय निमित्ताने, अत्यावश्यक सेवेसाठी कायदेशीर परवानगी घेऊन नागरिक किरणपाणी आरोंदा चेक नाक्यावरून ये-जा करत होते, त्यांना आता किमान 20 पेक्षा जास्त किलोमीटर प्रवेश करून पत्रादेवी नाका गाठावा लागणार 
आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com