आरएसएसचे प्रांत अध्यक्ष नाना बेहरे यांचा बोरीतील मंदिरांतर्फे सत्कार

प्रतिनिधी
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे गोवा प्रांत अध्यक्ष नाना बेहरे यांनी रामजन्मभूमी आंदोलनात १९९१ साली प्रत्यक्ष भाग घेऊन  आपल्या काही काही करसेवक सहकाऱ्यांना घेऊन ते अयोध्येत गेले.

बोरी: राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे गोवा प्रांत अध्यक्ष नाना बेहरे यांनी रामजन्मभूमी आंदोलनात १९९१ साली प्रत्यक्ष भाग घेऊन  आपल्या काही काही करसेवक सहकाऱ्यांना घेऊन ते अयोध्येत गेले. त्यावेळी त्यात अनेक प्रसंगाना तोंड द्यावे लागले. बेहेरसारख्या अनेक करसेवकांच्या धैर्याने आणि त्यागाने रामजन्मभूमीचा प्रस्न सुटला आहे व बुधवार ५ऑगस्टचा राममंदिर शिलान्यास समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घडून आला आहे. तमाम भारतीयांच्या आयुष्यातील हा ऐतिहासिक क्षण असून यापुढे देशात रामराज्य अवतरणार आहे असे प्रतिपादन बोरीच्या श्री नवदुर्गा संस्थानचे अध्यक्ष शाम प्रभुदेसाई यांनी केले. 

बोरीतील श्री नवदुर्गा मंदिर, श्री गोपाळकृष्ण मंदिर, श्री सिध्दनाथ मंदिर, श्री सत्यनारायण मंदिर कुडयाळ, गणपती मंदिर पेडार, श्री नारायणदेव मंदिर सोनारभाट, श्री साईबाबा मंदिर आवेडे आदी देवस्थानच्या वतीने करसेवक नाना बेहरे, प्राचार्य मिनानाथ उपाध्ये, अभियंते अंकुश गावकर, श्रीराम पालकर यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शामप्रभुदेसाई बोलत होते.करसेवक नाना बेहरे व अन्य करसेवकांचा यावेळी प्रभुदेसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उत्कर्ष प्रभूबोरकर, विश्‍वंभर देवारी,  दत्तात्रय देवारी, सत्कार समारंभात सहभागी देवस्थानचे अध्यक्ष्ष शाम नाईक, जयेश बोरकर, संजय गावडे, नारायण नाईक आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना नाना बेहरे यांनी करसेवेच्या वेळी अयोध्येत आलेल्या अनुभवाचे कथन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराचे भूमीपूजन होणे हे सर्व भारतीयांना अभिमानास्पद गोष्ट असल्याचे बेहरे यांनी सांगून गावातील सर्व मंदिरानी आम्हा करसेवकांचा सत्कार समारंभ घडवून आणल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. उत्कर्ष प्रभूबोरकर यांनी स्वागत केले. दत्तात्रय देवारी यांनी सूत्रसंचालन केले तर  विश्‍वंभर देवारी उर्फ बाप्पा देवारी यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या