मालभाट मशिदीजवळील कचऱ्याच्या राशी हटविल्या

कचरा रात्रीच्या वेळी आणून टाकला जातो त्यामुळे पोलिसांनी (Police) रात्री या भागात गस्त ठेवावी आणि कुणी जर कचरा आणून टाकत असल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कडक कारवाई (Action) करावी
मालभाट मशिदीजवळील कचऱ्याच्या राशी हटविल्या
कचऱ्याच्या राशी हटवताना नगरसेविका रोनिता आजगावकर व इतर Dainik Gomantak

मडगाव: मालभाट मडगाव येथील मशिदीच्या मागे तयार झालेला कचऱ्याचा ढिगारा आज स्थानिक नगरसेविका (Corporator) रोनिता आजगावकर यांनी पुढाकार घेऊन हटविला.

मडगाव बाहेरचे लोक आणि हॉटेलवाले आपला कचरा येथील मोकळ्या जागेत आणून फेकत असल्याने या भागात मिनी सोनसोडा तयार झाला होता. मडगाव नगरपालिकेच्या मदतीने पोकलीन लावून या कचऱ्याच्या राशी हटविल्या.

कचऱ्याच्या राशी  हटवताना नगरसेविका रोनिता आजगावकर व इतर
मडगाव रवींद्र भवन संस्थेला अपेक्षित अनुदान मिळणार; सगुण वेळीप

या संदर्भात बोलताना या प्रभागाचे माजी नगरसेवक राजेंद्र आजगावकर यांनी यापूर्वीच्या नगरसेवक तसेच स्थानिक आमदारांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यानेच या कचऱ्याच्या राशी वाढल्या असा आरोप करत आता ही जागा साफ झाल्यानंतर तरी पुन्हा असा उकिरडा तयार होऊ नये यासाठी पालिका आणि मडगाव पोलिसांनी दक्ष राहावे अशी मागणी केली.

हा कचरा रात्रीच्या वेळी आणून टाकला जातो त्यामुळे पोलिसांनी रात्री या भागात गस्त ठेवावी आणि कुणी जर कचरा आणून टाकत असल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com