विकासाच्या नावाखाली गोवा नष्ट करण्याचे प्रकल्प सरकारने हाती घेतले: आमदार विजय सरदेसाई

 On the ruling MLA Take action Vijay Sardesai
On the ruling MLA Take action Vijay Sardesai

सासष्टी: रेलमार्ग दुपदरीकरणाच्या विरोधात चांदर परिसरात पुकारण्यात आलेल्या आंदोलनात पोलिसांनी सहा आंदोलकांवर गुन्हा दाखल करणे निषेधार्थ असून गोवा सांभाळण्यासाठी सुरू केलेल्या या चळवळीला गोवा फॉरवर्ड पक्ष तसेच सत्ताधारी पक्षातील आमदारांकडूनही समर्थन मिळत असल्यामुळे आधी सत्ताधारी पक्षातील या आमदारांवर कारवाई करा, असा इशारा गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. 


विकासाच्या नावाखाली गोवा नष्ट करण्याच्या हेतूने सरकारने अनेक प्रकल्प हाती घेतलेले असून या जनविरोधी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या व्यक्तींचा आवाज दाबण्यासाठी गुन्हे दाखल करण्यात येत आहे. चांदर येथे झालेल्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला होता तर सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारही या चळवळीला पाठिंबा देत आहे.पण, अद्याप आमच्याविरुद्ध तसेच या सत्ताधारी पक्षातील आमदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून हिम्मत असल्यास गुन्हा दाखल करून दाखवावा, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले. कोळसा वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात रेलमार्गाचे दुपदरीकरण करण्यात येत असल्यामुळे गोमंतकीयांनी ही चळवळ सुरू केलेली असून या चळवळीला गोवा फॉरवर्ड पक्षाने याआधी पाठिंबा दिला होता आणि यापुढेही पाठिंबा देत राहणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


गोवा सरकारने जिंदालच्या जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडला १५६ करोड रुपयांची मागणी करणारी नोटिस बजावली होती. या नोटिशीवर उच्च न्यायालयाने स्थगिती आणली असून ही स्थगिती कशी मिळाली यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांना स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. सरकार परप्रांतीयांच्या भल्यासाठी काम करीत असून सरकारला गोमंतकीयांचे काहीही पडलेले नाही, असा आरोप विजय सरदेसाई यांनी केला. म्हादई प्रश्नी लढणार असल्याचे आश्वासन सरकारकडून करण्यात येत आहे. पण, अद्याप सरकारने कुठल्याही प्रकारची कृती केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. 

अनावश्‍यक खर्च
गोवा मुक्ती दिनाच्या साठाव्या वर्षानिमित्त गोवा सरकाराने आझाद मैदानावर भव्य कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमावर सरकार २ कोटी रुपये खर्च करणार आहे. कोरोनामुळे गोमंतकीय नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट बनली असून नागरिकांवर मार्गदर्शक तत्वांचे बंधन घालून सरकारने मुक्तिदिन साजरा करण्यासाठी इतका अनावश्‍यक पैसा खर्च करणे चुकीचे आहे, असे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com