गोवा पुन्हा 'लॉकडाऊन'च्या दिशेने ?

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

 येत्या काही दिवसात गोव्यात पुन्हा लॉकडाऊनच्या होईल, अशा स्वरूपाचे संदेश गेल्या दोन दिवसांपासून समाजमाध्यामांवर झळकत आहेत, त्यामुळे गोवा पुन्हा लॉकडाऊनमध्ये जाणार का, असा प्रश्न उपसिथित करण्यात येत होता.

पणजी :   येत्या काही दिवसात गोव्यात पुन्हा लॉकडाऊनच्या होईल, अशा स्वरूपाचे संदेश गेल्या दोन दिवसांपासून समाजमाध्यामांवर झळकत आहेत, त्यामुळे गोवा पुन्हा लॉकडाऊनमध्ये जाणार का, असा प्रश्न उपसिथित करण्यात येत होता. याच पार्श्वभूमीवर, गोव्यात लॉकडाऊन लागू करण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नसून, समाजमाध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या अशा अफवांना बळी न पडण्याचं आवाहन गोव्याचे बंदर व ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी केलं. 

गोव्यातील संभाव्य लॉकडाऊनच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर मंत्री मायकल लोबो यांनी स्पष्टीकरण दिलं की, गोवा पर्यटनासाठी बंद होणार नाही. लॉकडाऊनमुळे राज्यातील पर्यटन व्यवसायावर परिणाम होईल. या संदेशांना “खोटी बातमी” असे संबोधून लोबो म्हणाले की, गोवा आणखी एक लॉकडाऊन करू शकत नाही. पर्यटनाशी निगडित व्यवसायांशी जोडलेले व्यवसाय आणि जीवनमान टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी खबरदारीच्या उपाययोजना करत राहण्याचे आश्वासन दिले. 
 

संबंधित बातम्या