गोव्यातील कुडचडे रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेचे डबे अचानक घसरले

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

रेल्वे वाहतूक सुरू करण्यासाठी रुळांची व गाडीची चाचणी घेत असतानाच आज गोव्यातील कुडचडे रेल्वे स्थानकानजीक अपघात झाला

कुडचडे : रेल्वे वाहतूक सुरू करण्यासाठी रुळांची व गाडीची चाचणी घेत असतानाच आज गोव्यातील कुडचडे रेल्वे स्थानकानजीक अपघात झाला, मात्र चाचणीची वेळ असल्यामुळे या रेल्वेगाडीत कोणी प्रवासी नव्हते. कुडचडे रेल्वे स्थानकापासून पन्नास मीटर अंतरावर दोन डब्यांना जोडणारा जॉईंट तुटला आणि डबे रुळावरून खाली घसरले. वास्को ते कुडचडे अशी वाहतूक करणारी रेल्वे गाडी कुडचडे रेल्वे स्थानकावर दाखल होण्यासाठी केवळ पन्नास मीटरचे अंतर असताना दोन डब्याना जोडणारा जॉईंट तुटून पडल्याने पन्नास मीटर अंतरावर जाऊन डबा रुळावरून घसरला.

गोव्यातली पहिलीच दुर्मिळ घटना; यकृतात वाढला अडीच महिन्यांचा गर्भ

ही रेल्वे चाचणी घेण्यासाठी वास्कोहुन कुडचडे रेल्वे स्थानकावर येत असताना ही घटना सकाळी साडे आठ वाजता कुडचडे येथे घडली. चाचणी साठी रेल्वे गाडी असल्याने कोणतेही प्रवासी गाडीत नव्हते. रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने उपाय योजना हाती घेण्यात आली असुन रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. हे स्थानक दक्षिण पश्चिम रेल्वेच्या लोंढा ते वास्को रेल्वे मार्गावर आहे.

महाराष्ट्राच्या धर्तीवर आता गोव्यात जाण्यासाठीही RT-PCR चाचणी बंधनकारक होण्याची शक्यता

संबंधित बातम्या