युवकांची उडवली नरकासुराने झोप

 युवकांची उडवली नरकासुराने झोप
in rural areas youths have started waking up at night

मोरजी : मी लवकरच येतोय असा नरकासुराचा संदेश सामाजिक माध्यमातून फिरू लागल्याने युवकांची झोपच उडाली आहे . एका बाजूने कोरोना महामारीचे संकट उभे आहे . तर दुसऱ्या बाजूने नरकासुराच्या भल्यामोठ्या प्रतिमा तयार करण्याचा युवकांचा उत्साह पाहिल्यास दिवसाचा रात्र आणि रात्रीचा दिवस करून युवक रात्री जागवू लागल्या. थंडीचे दिवसही  सुरु झाले शेकोट्या पेटवून नरकासुराच्या प्रतिमा तयार करण्यास युवक कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे .


दिवाळीच्या पूर्वसंध्येला काही ठिकाणी मध्यरात्री, काही ठिकाणी पहाटे नरकासुराच्या प्रतिमा तयार करून त्याला आग लावली जाते . त्या प्रतिमेवर हजारो रुपये खर्च करून अक्राळविक्राळ रूप आपल्या कल्पनेनुसार युवक प्रतिमा तयार करतात , बाजारात मोठ मोठे उपलब्ध असलेले मुखवटे आणून त्याच्यावर चढवले जातात .
ग्रामीण भागात काही ठिकाणी युवक रात्री जागवू लागल्या आहेत , नरकासुराच्या प्रतिमा तयार करण्यासाठी लागणारे सामान . कागद ,गम तयार करून प्रतिमा तयार केल्याजातात .

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com