water scarcity
water scarcity

काणकोणचा ग्रामीण भाग तहानलेला

सुभाष महाले

काणकोण

ग्रामीण काणकोण दरवर्षाप्रमाणे यंदाही पाण्यासाठी ताहनलेलाच आहे.घटक राज्याचा दर्जा मिळून तीन दशकाचा काळ लोटला आहे.मात्र काणकोणच्या  ग्रामीण भागात शुद्ध पेय जलाची मारामारच आहे.उन्हाळ्यात एकतर टॅंकरच्या पाण्यावर येथील रहिवाश्याना अवलंबून रहावे लागते जे अंतर्गत भाग आहेत त्या ठिकाणी नदीची पात्रे आटल्यानंतर नदीच्या पात्रात खड्डे खणून पाणी मिळवले जाते.खोतीगाव, गावडोंगरीच्या काही भागात ग्रामीण जलपुरवठा योजनेअंतर्गत कुपनलिकेद्वारे पाण्याची तजवीज करण्यात आली होती मात्र या कुपनलिका जीर्ण झाल्या आहेत पंप नादुरुस्त झाले आहेत काही ठिकाणी पाणी वाहून नेण्यासाठी घातलेल्या लोखंडी जलवाहिन्याना गंज चढून त्याना ठिकठिकाणी गळती लागली आहे.खोतीगावातील येडा,नडके,येंंड्रे तामनामळ,गावडोंगरीतील पान्न,झिल्तावाडी,तुडल,इंद्रावाडा फुलामळ त्याचप्रमाणे अन्य भागात पेय जलासाठी रहिवाश्याना धडपड करावी लागत आहे.फुलामळ वाड्याच्या खाली गावणे धरण आहे मात्र त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.  पैगीण पंचायत क्षेत्रातील मार्ली-तिर्वाळ, दाबेल या भागात ही पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे.मार्ली वाड्यावरील रहिवासी नैसर्गिक झऱ्यावर अवलंबून आहेत मात्र मे महिन्यात हा नैसर्गीक झरा आटत असल्याने नदीच्या पात्रातील स्तोत्राचा त्यांना आश्रय घ्यावा लागत आहे.दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी मामलेदार विमोद दलाल याच्यासह त्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी जिल्हापंचायतीच्या निवडणूकावर बहिष्कार घालण्याचे येथील रहिवाश्यानी जाहीर केल्यानंतर या वाड्याला भेट दिली होती त्यावेळी येथील पाणी समस्या मिटवण्यासाठी येथील जुनी कुपनलिका दुरुस्त करण्याची मागणी रहिवाश्यानी केली होती. दाबेल येथे कुपनलिकेचे पाणी पुरवण्यात येत होते ती कुपनलिका नादुरुस्त झाल्याने येथील रहिवाश्याचे पाण्यासाठी हाल होत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com