तळागाळातील महिलांचाही जनमन उत्सव सर्वेक्षणात सहभाग

भविष्‍यातील चांगला गोवा घडविण्याच्या उद्देशाने ‘गोमन्‍तक’च्‍या जनमन उत्सव सर्वेक्षणात तळागाळातील महिलाही उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.
Rural women also participated in Janman Utsah survey
Rural women also participated in Janman Utsah surveyDainik Gomantak

मडगाव: भविष्‍यातील चांगला गोवा घडविण्याच्या उद्देशाने ‘गोमन्‍तक’च्‍या जनमन उत्सव सर्वेक्षणात तळागाळातील महिलाही उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. आज पोखरमळ-चांदर येथील गवळी समाजातील महिला या सर्वेक्षणात सहभागी झाल्या. त्यांनी आपली मते आवर्जून नोंद केली.

दिवाळीच्या दिवसात काही काळासाठी बंद ठेवलेले हे सर्वेक्षण आजपासून पुन्हा सुरू झाले. कुंकळ्ळी मतदारसंघात येणाऱ्या चांदर आणि गिर्दोली येथे आज हे सर्वेक्षण करण्यात आले. गोव्यातील महिलांना भविष्यात गोव्यात काय व्हावे असे हे वाटते हे जाणून घेण्यासाठी 40 सही मतदारसंघांत हे सर्वेक्षण केले जाणार असून गोव्यातील तब्‍बल तीन लाख महिलांची मते नोंद करून घेण्‍यात येणार आहेत.

कुठ्ठाळी मतदारसंघातील सांखवाळ येथेही महिलांनी आपली मते नोंदविली. कुडचडे मतदारसंघात तिळामळ, निर्मलानगर, पेडामळ, काकुमड्डी, घणेमरड, टाकी, झरीवाडा-काकोडा येथेही सर्वेक्षण करण्यात आले. त्याला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com