हरमलात बेकायदेशीर चरसप्रकरणी रशियन पर्यटकास अटक

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

धलावाडा -  हरमल येथे  बेकायदेशीर गांजा बाळगल्याप्रकरणी पेडणे  पोलिसांनी  वशालि स्पाक या रशियन राष्ट्रीयत्व असलेल्या पर्यटकाला अटक केली.त्याच्याकडून १०,०००रु.चा गांजा जप्त करण्यात आला

 पेडणे : मधलावाडा- हरमल येथे  बेकायदेशीर गांजा बाळगल्याप्रकरणी पेडणे  पोलिसांनी  वशालि स्पाक या रशियन राष्ट्रीयत्व असलेल्या पर्यटकाला अटक केली.त्याच्याकडून १०,०००रु.चा गांजा जप्त करण्यात आला.

एक रशियन पर्यटक  बेकायदेशीर अंमली पदार्थ व्यवहारात गुरफटला असल्याची  माहिती  पोलीस निरीक्षक जिवबा दळवी  यांना मिळाल्यानंतर त्याच्यावर गुप्त  पाळत ठेवण्यात आली होती.त्यानुसार त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे गांजा सापडला.पेडणे  पोलीस ठाण्याचे निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक हरिष वायंगणकर,संजीत कांदोळकर,कॉस्टेबल विनोद पेडणेकर,अनिशकुमार पोके,रवी म्हाळोजी,भास्कर चारी, प्रवीण महाले व स्मिता गावस यांनी या मोहिमेत भाग घेतला.

संबंधित बातम्या