मोरजीत 8.50 लाखांच्या ‘एलएसडी’सह रशियन पर्यटकाला अटक

दैनिक गोमंतक
गुरुवार, 10 जून 2021

पेडणे पोलिसांची मोठी कारवाई

पेडणे: पेडणे पोलिसांनी आज मोरजी येथे डिमिट्री बोल्डोव या रशियन पर्यटकाकडून 8 लाख 50 हजार रुपयांचा एलएसडी या अंमली पदार्थासह अटक केली. तसेच गेस्ट हाउस मालकाने या पर्यटकाचा सी - फॉर्म न भरल्याने त्याच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला. (Russian tourist arrested with LSD worth Rs 8.50 lakh)

पेडणे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरिश वायंगणकर, पोलिस शिपाई महेश नाईक, विनोद पेडणेकर, रोहन वेळगेकर, दयेश खांडेपारकर व विष्णू गाड यांनी ही कामगिरी बजावली. गेल्‍या काही महिन्‍यांपासून किनारपट्टी परिसरात अमलीपदार्थ व्‍यवहार वाढले आहेत. पोलिस (Goa Police) कारवाईवरून ते उघड होत आहे.

संबंधित बातम्या