Goa Tourism: अखेर ‘ते’ प्रवासी सुखरूप पोहोचले

बॉम्बची अफवाच : हास्यमुद्रेने दाबोळीवर रशियन पर्यटकांचे आगमन
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

Goa Tourism: अखेर माॅस्को-गोवा फ्लाईटमधील 244 विमान प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. दाबोळी विमानतळावर काल दुपारी (17 तासांनंतर) या विमानाचे व्यवस्थित लॅण्डिंग झाले. बॉम्बच्या धमकीनंतर सोमवारी रात्री गुजरातच्या जामनगर विमानतळावर या विमानाचे आपत्कालीन लॅण्डिंग केले होते. मात्र, विमानात कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही.

मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या चार्टर विमानात बॉम्ब असल्याची माहिती सोमवारी रात्री उशिरा मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे हे विमान तत्काळ जामनगरमध्ये उतरावावे लागले होते.

Goa Tourism
South Goa: चिखली चौक ते ‘आयओसी’ जंक्शनपर्यंत अवजड वाहनांना बंदी

जामनगरमध्ये विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पण तपासानंतर काहीच न आढळल्याने जामनगरला उतरलेले विमान मंगळवारी दुपारी रशियन पर्यटकांसह गोव्यात दाखल झाले.

गोवा एटीसीला सोमवारी मॉस्कोहून गोव्यात येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा ई-मेल प्राप्त झाला होता. त्यामुळे दाबोळी विमानतळावर स्थानिक पोलिस, रुग्णवाहिका आणि बॉम्बशोधक पथक, अग्निशमन दल दाखल झाले होते.

Goa Tourism
Electric Vehicles: इलेक्ट्रिक वाहनांना ‘अच्छे दिन’

याशिवाय सीआयएसएफचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकही विमानतळावर दाखल झाले होते. मात्र, हे विमान गोव्यात न उतरवता थेट गुजरातमधील जामनगर येथे त्याचे इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले. या विमानात 244 प्रवासी होते. तेथे विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. हे विमान आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com