
वाळपई : देशात गेल्या आठ वर्षात अनेक सर्वांगीण विकासकामे पूर्णत्वास गेली आहेत. आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण संकल्पना राबवून युवकांना नवीन दिशा दिली आहे. त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींजीचे फार मोठे योगदान लाभले आहे. गेल्या आठ वर्षात 370 कलम हटवणे, अयोध्येत श्रीराम मंदिर, तीन तलाक असे विविध विषय सोडवले आहेत. ऐतिहासिक निर्णयाने देशात खरी क्रांती केली आहे, असे प्रतिपादन भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले. वाळपई कदंब सभागृहात शुक्रवारी सायंकाळी आयोजित भाजपच्या गरीब कल्याण संमेलनात तानावडे बोलत होते.
मोदींनी महत्वाचे निर्णय तडीस नेले आहेत. देशातील मालाला ब्रॅंडींग मिळण्यासाठी खादी उद्योगाला चालना दिली आहे. मोफत शौचालय योजना लोकांना पुरवून स्वच्छतेवर भर दिला आहे, असे तानावडे म्हणाले. पूर्वी जम्मू काश्मीर देशाचाच भाग असूनही तिथे जाण्यासाठी पासपोर्ट लागत असे. त्यासाठी स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आंदोलन केले होते. त्यासाठी काश्मीरमध्ये मुखर्जींना अटकही झाली होती. पण आजच्या घडीला मोदींनी 370 कलम हटवून मोठा निर्णय घेतला. त्यामुळे मुखर्जींच्या आत्म्यास शांती मिळाली आहे,असेही प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले,की केंद्र सरकारने कोरोना काळात गोव्याला भरभरून सहाय्य केले आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींजींचे खूप योगदान आहे. देशाला मोदींजींच्या रुपाने चांगले सक्षम नेतृत्व लाभले आहे. वाळपई उसगाव भागाचा विकास हेच आपले ध्येय आहे. भाजपमुळेच सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे. लोक भाजप सोबत ठामपणे उभे आहेत. सरकार लोकांनी निवडले आहे. तो विश्वास कायम रहाण्यासाठी आपण कटिबध्द आहोत. तरुण पिढी, महिलांचा विकास हेच धोरण आहे ,असेही राणे म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.