Goa: सेंट ॲना सायबिणीचे फेस्‍त एक ऑगस्टला

सांतान (Santan, Goa) येथील सेंट ॲना सायबिणीचे (Saint Ana) फेस्‍त अर्थात काकड्यांचे फेस्‍त दि. १ ऑगस्ट रोजी साजरे होणार आहे.
Goa: सेंट ॲना सायबिणीचे फेस्‍त एक ऑगस्टला
Goa: Saint Ana ChurchDaily Gomantak

गोवा वेल्हा : सांतान येथील सेंट ॲना सायबिणीचे फेस्‍त अर्थात काकड्यांचे फेस्‍त दि. १ ऑगस्ट रोजी साजरे होणार आहे. या फेस्ताच्या नऊ दिवसांच्या प्रार्थना सभा (नोव्‍हेना) दि. २३ जुलैपासून सकाळ-संध्याकाळ सुरू राहणार आहेत. कोविड महामारीचा काळ लक्षात घेऊन भाविकांसाठी चर्चमधील धर्मगुरूंच्या सर्व प्रार्थना सभा चर्चच्या ऑफिशियल चॅनलवरून प्रसारित करण्यात येणार आहेत.

Goa: Saint Ana Church
Goa: सालेली गडावर स्थानिक युवकां तर्फे वृक्षारोपण

शुक्रवार, दि. २३ रोजी प्रार्थना सभांना प्रारंभ होणार आहे. पहिली सभा सकाळी ७ व दुसरी संध्याकाळी ५ वाजता प्रसारित होईल. दि. १ ऑगस्ट रोजी मुख्य फेस्‍ताच्या काळात दिवसभरात एकूण चार प्रार्थना सभांचे आयोजन होईल. यात सकाळी ७, ८.१५, १० व संध्याकाळी ४ वाजता प्रार्थना सभा होईल. सकाळी १० वा. होणाऱ्या मुख्य प्रार्थना सभेचा यात समावेश असेल. ही प्रार्थना सभा थेट प्रसारित होईल. भाविकांच्या गैरसोयीबद्दल आयोजकांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. येथील सर्व नियोजित कार्यक्रम साधेपणाने साजरे होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Goa: Saint Ana Church
Goa: शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची आमदार सरदेसाई यांची सरकारकडे मागणी
No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com