संत जगन्नाथ बोरीकर यांचे कार्य महत्त्वाचे

प्रतिनिधी
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

उद्योजक श्‍याम प्रभुदेसाई यांचे प्रतिपादन; भजनी सप्ताहाचे आयोजन  

बोरी: संत जगन्नाथबुवा बोरीकर यांनी गोव्याच्या विविध गावातील मंदिरात भजनी सप्ताह सुरू करून गावात स्वच्छता आणि आपसात एकोपा निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य असून आज जगात कोरोनाचा संसर्ग वाढून या महामारीचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. म्हणूनच थोर संतानी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आपले आरोग्य व आयुष्य सुखाने घालवण्यासाठी सर्वांनी पूर्वजांनी घालून दिलेल्या वचनाप्रमाणे घालवावे असे प्रतिपादन बोरीच्या श्री नवदुर्गा मंदिर समितीचे अध्यक्ष आणि उद्योजक श्‍याम प्रभुदेसाई यांनी केले.

रविवार १३ रोजी देऊळवाडा बोरी येथील संत जगन्नाथ बुवा बोरीकर समाधी मंदिरात प्रतिभा फ्रेंडस सर्कलने आयोजित केलेल्या संत जगन्नाथ बुवा बोरीकर यांच्या १३५ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी  सामाजिक अंतर पाळून अत्यंत साध्या पध्दतीन साजरा केला गेला. 

या समारंभाचे उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर शेणवी उसगावकर, प्रतिभा फ्रेंडस सर्कलचेअध्यक्ष उद्योजक जयंत मिरींगकर, उपाध्यक्ष विश्र्वंभर उर्फ बाप्पा देवारी, खोर्ली येथील सह्याद्री ऑफसेट सिस्टमचे मालक व जगन्नाथ बुवांचे परम भक्त सागर भट, विनोद पोकळे, शिवाजीबुवा सावकर, जितेंद्र खोलकर, मिलिंद देवारी, जयंती देसाई रमण, रंजना प्रभू, आनंद नाईक, दिगंबर रायकर, विश्रांती पैदरकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

प्रभूदेसाई म्हणाले की, कोरोनामहामारीत प्रत्येक माणसांनी सामाजिक अंतर ठेवून आणि तोंडाला मास्क घालून आपला बचाव करून घ्यावा तसेच पूर्वजांची पुण्याई लाभण्यासाठी थोर संताच्या शिकवणीप्रमाणे आपले आचरण ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. संत जगन्नाथबुवांच्या हयातीनंतरही प्रतिभा फ्रेंडस सर्कल त्याच्या स्मृती जागवून संताचे कार्य पूढे नेण्याचे महत्वपूर्ण काम करत असल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. 

नंदकिशोर शेणवी उसगावकर यांच्या हस्ते पारंपरिक समई प्रज्वलित करून नामजप कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. तद् पूर्वी श्री नवदुर्गा मंदिरात सर्व भाविक जाऊन श्री नवदुर्गेचे आशिर्वाद घेण्यात आले. अर्चक दत्तात्रय उर्फ बाबू देवारी यांनी गाऱ्हाणे घालून आशिर्वाद दिले. संस्थेचे अध्यक्ष जयंत मिरींगकर यांनी स्वागत केले. विश्र्वंभर देवारी आणि विनोद पोकळे यांनी पाहुण्यांना गुलाबपुष्पे अर्पून स्वागत केले. जितेंद्र खोलकर यांनी सूत्रसंचालन केले. तर सागर भट यांनी आभार मानले. त्यानंतर श्री राम जय राम जय जय राम नामजप झाला. रात्री भजनाचा कार्यक्रम झाला. यात सुनिता पारपती, विश्रांती पैदरकर, संध्या भट  बोरकर, दत्तात्रय उर्फ बाबू देवारी, बाबल भट बोरकर, मिलिंद देवारी, दिलीप च्यारी, सचिन बोरकर, दिगंबर देवारी, विनय नाईक, उदय नाईक, विनोद नाईक, शिवाजी सावकर, महेंद्र सावकर, कृष्णाकुमार नाईक, अशोक प्रभू, गोकुळदास नाईक, जितेंद्र खोलकर, विश्र्वनाथ वर्दे बोरकर, विश्र्वंभर देवारी आदींनी भाग घेऊन उत्कृष्ट भजन सादर केले. त्यानंतर आरत्या झाल्या. या उत्सवात संत जगन्नाथबुवांच्या बऱ्याच भक्तांनी भाग घेतला होता.

संबंधित बातम्या