जग झालेय डिजिटल; व्यवसायही डिजिटल हवाच!

गोमंतक ऑनलाईन टीम
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

सकाळच्या या डिजीटल प्लॅटफॉर्मवर आपल्या व्यवसायासाठी आपल्या कल्पनेतील किंवा आपल्याला हवी तशी एक डिजीटल प्रोफाईल तयार करण्यात येईल. ज्यातून आपण आपल्या व्यवसायाचे एक 'इंम्प्रेशन' सेट करू शकता.

कोरोनाकाळात आणि त्यानंतर अनेक नवीन पायंडे रोजच्या जगण्यात रूढ झाले आहेत. रोजच्या जगण्याच्या, खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून ते थेट चैनीच्या साधनांपर्यंत सारं काही एक क्लिक दूर आहे. चौकटीच्या बाहेर न पडता सर्व गोष्टी दारापर्यंत उपलब्ध होतात. हे सर्व कसं चालतं? तर अर्थातच याचं उत्तर आहे डिजिटलाइझेशन. सेवा क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी या डिजिटलाइजेशनचा परिपूर्ण उपयोग करत आपल्या ग्राहकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. ग्राहकांबरोबरच अनेक एका खुल्या बाजारात आपली उत्पादने विकू पाहणाऱ्या कंपन्यांनाही याचा लाभ झाला. त्यामुळे आज उद्योग क्षेत्रातील अनेकांनी या डिजिटलाइजेशनच्या स्पर्धेत उडी घेत आपापले व्यवसाय थाटले आहेत. मात्र, अजूनही काही छोटे उद्योग, व्यवसाय असे आहेत जे या स्पर्धेपासून कितीतरी दूर आहेत. किंबहूना त्यांना या स्पर्धात्मक जगाचा अंदाजच नाही. असे व्यवसाय करणाऱ्या किंवा नव्याने करू पाहणाऱ्या उद्योजकांसाठी सकाळने नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. ज्यातील प्रत्येक व्यवहार डिजिटली घडणार आहे.  

सकाळच्या या डिजीटल प्लॅटफॉर्मवर आपल्या व्यवसायासाठी आपल्या कल्पनेतील किंवा आपल्याला हवी तशी एक डिजिटल प्रोफाईल तयार करण्यात येईल. ज्यातून आपण आपल्या व्यवसायाचे एक 'इंम्प्रेशन' सेट करू शकता. डिजिटलाईजेशनच्या या युगात आपल्या उत्पादनांची आकर्षक मांडणी करून आपण ती ग्राहकांसाठी उपलब्ध कशी करून देऊ शकू यासाठीही सकाळचे हे डिजिटल प्लॅटफॉर्म आपल्याला मदत करणार आहे. वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी अनेक व्यावसायिक तसेच ग्राहकांनाही सोयीचे ठरतील असे डिजिटल व्यवहार करण्यात येतील. जे पूर्णत: सोपे आणि सुरक्षित असतील. उत्पादने ग्राहकांपर्यंत वेळेवर पोहोचण्यासाठी सुरक्षित डिलीव्हरीची सेवाही सकाळचा हा प्लॅटफॉर्म आपल्याला उपयोगाचा ठरणार आहे. या शिवाय आपला व्यवसाय वृद्धींगत होण्यासाठी अनेक सुविधा या प्लॅटफॉर्मवर असतील. 

या प्लॅटफॉर्मवर तुम्ही कोणते व्यवसाय सुरू करू शकता?   

 • खाद्य पदार्थांचे व्यवसाय (FOOD)
 • घरगुती साधनांशी संबंधीत व्यवसाय (HOME)
 • व्यवसाय/धंदा (PROFESSIONAL) 
 • आरोग्य क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय (HEALTH) 
 • नवीन रित संबंधीत व्यवसाय (FASHION)
 • वैयक्तिक सेवा संबंधीत व्यवसाय (PERSONAL CARE) 
 •  खेळाशी संबंधीत व्यवसाय (SPORTS)
 •  ऑटोमोबाईल्स संबंधीत व्यवसाय (AUTOMOTIVE) 
 •  कार्यालयांच्या संबंधीत व्यवसाय( OFFICE SUPPILES)
 • शैक्षणिक व्यवसाय (EDUCATION)
 • विद्यूत उपकरणांशी संबंधीत व्यवसाय (ELECTRONICS)
 • मनोरंजनाशी संबंधीत व्यवसाय (ENTERTAINTMENT)  
   

संबंधित बातम्या